‘आयएनएस’च्या अध्यक्षपदी आदिमूलम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 02:24 AM2020-09-26T02:24:10+5:302020-09-26T02:25:27+5:30

राकेश शर्मा कोषाध्यक्ष; कार्यकारी समितीवर विजय दर्डा, करण दर्डा यांची फेरनिवड

Adimulam as the President of INS | ‘आयएनएस’च्या अध्यक्षपदी आदिमूलम

‘आयएनएस’च्या अध्यक्षपदी आदिमूलम

Next

बंगळुरू : इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) वर्ष २०२०-२०२१ वर्षासाठी अध्यक्षपदी दिनामलार गटाचे एल. आदिमूलम यांची निवड झाली. आयएनएसची ८१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी येथे झाली. तीत ही निवड झाली. आयएनएस ही देशातील वृत्तपत्रे, मासिके व नियतकालिकांच्या प्रकाशकांची सर्वोच्च संस्था आहे. आदिमूलम यांच्या आधी अध्यक्षपदी मिड-डेचे शैलेश गुप्ता होते.


डेप्युटी प्रेसिडेंट म्हणून आनंद बाझारपत्रिकेचे डी.डी. पुरकायस्थ, तर टाइम्स आॅफ इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष (सप्लाय चेन) मोहित जैन हे नवे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. लोकमतचे (दिल्ली आवृत्ती) प्रकाशक राकेश शर्मा मानद कोषाध्यक्षपदी निवडून आले आहेत.
मेरी पॉल या आयएनएसच्या नव्या सरचिटणीस आहेत.
साप्ताहिक ‘बाँबे समाचार’चे होरमुसजी एन. कामा यांची संस्थेच्या कार्यकारी समितीवर फेरनिवड झाली. भारतीय वृत्तपत्र उद्योगाला ज्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागले त्यातून कामा यांच्या नेतृत्वाखाली आयएनएसने मार्ग काढले.


आयएनएसच्या कार्यकारी समितीचे इतर सदस्य : एस. बालासुब्रमणियम आदित्यन (दैनिक थांथी), गिरीश अग्रवाल (दैनिक भास्कर, भोपाळ), समाहित बाल (प्रगतीवादी), गौरव चोप्रा (फिल्मी दुनिया), विजय कुमार चोप्रा (पंजाबी केसरी, जालंधर), जगजित सिंग दर्दी (दैनिक चारदीकला), विवेक गोएंका (द इंडियन एक्स्प्रेस, मुंबई), महेंद्र मोहन गुप्ता (दैनिक जागरण), प्रदीप गुप्ता (डाटाक्वेस्ट), संजय गुप्ता (दैनिक जागरण, वाराणसी), शिवेंद्र गुप्ता (बिझनेस स्टँडर्ड), सरविंदर कौर (अजित), एम.व्ही. श्रेयांस कुमार (मातृभूमी आरोग्य मासिका), आर. लक्ष्मीपथी (दिना मलार), तन्मय माहेश्वरी (अमर उजाला, दिल्ली), विलास ए. मराठे (दैनिक हिंदुस्थान, अमरावती), हर्षा मॅथ्यू (वनिथा), दिनेश मित्तल (हिंदुस्थान टाइम्स, पाटणा), नरेश मोहन (संडे स्टेटसमन), अनंत नाथ (गृहशोभिका, मराठी), प्रताप जी. पवार (सकाळ), राहुल राजखेवा (द सेंटिनेल), आर.एम.आर. रमेश (दिनाकरन), के. राजा प्रसाद रेड्डी (साक्षी, विशाखापट्टणम), अतिदेब सरकार (द टेलिग्र्राफ), प्रवीण सोमेश्वर (द हिंदुस्थान टाइम्स), किरण डी. ठाकूर (तरुण भारत, बेळगाव), बिजू वर्गीस (साप्ताहिक मंगलम), आय. वेंकट (अन्नदाता), विनय वर्मा (द ट्रिब्यून), कुंदन आर. व्यास (व्यापार, मुंबई), के.एन. टिलक कुमार (डेक्कन हेराल्ड आणि प्रजावाणी), रवींद्र कुमार (द स्टेटसमन), किरण बी. वडोदारिया (संभाव मेट्रो), पी.व्ही. चंद्रन (गृहलक्ष्मी), सोमेश शर्मा (साप्ताहिक राष्ट्रदूत), जयंत माम्मेन मॅथ्यू (मल्याळम मनोरमा) आणि शैलेश गुप्ता (मिड-डे).

लोकमत मीडियाच्या एडिटोरिअल बोर्डचे अध्यक्ष विजय दर्डा आणि कार्यकारी संचालक करण दर्डा यांची आयएनएसच्या कार्यकारी समितीच्या सदस्यपदी फेरनिवड झाली. विजय दर्डा हे १९९७-९८ मध्ये आयएनएसचे अध्यक्ष होते.

Web Title: Adimulam as the President of INS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.