‘आदित्य’ने टिपली सूर्यावर उठलेली भीषण साैर वादळे, ‘इस्राे’ने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 06:45 AM2024-06-11T06:45:00+5:302024-06-11T06:45:16+5:30
Aditya L-1: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठविलेल्या आदित्य एल-१ या यानाने मे महिन्यात निर्माण झालेल्या भीषण साैर वादळाला कॅमेऱ्यात कैद केले आहे. या वादळाची विविध प्रकारचे सेन्सर असलेल्या लेन्समधून छायाचित्र टिपली आहेत.
बंगळुरू - सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठविलेल्या आदित्य एल-१ या यानाने मे महिन्यात निर्माण झालेल्या भीषण साैर वादळाला कॅमेऱ्यात कैद केले आहे. या वादळाची विविध प्रकारचे सेन्सर असलेल्या लेन्समधून छायाचित्र टिपली आहेत.
आदित्य एल-१ यान पृथ्वीपासून दीड काेटी किलाेमीटर अंतरावर एल१ या लॅग्रान्ज पाॅइंटवर स्थिरावले आहे. तेथून सूर्यावर लक्ष ठेवणे शक्य आहे. ‘आदित्य’ने मे महिन्यात टिपलेली छायाचित्रे ‘इस्राे’ने साेशल मीडियावर टाकली असून यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘आदित्य’वर ‘साेलर अल्ट्राव्हायाेलेट इमेजिंक टेलिस्काेप’ तसेच ‘व्हिसिबल इमिशन लाइन काेराेनाग्राफ’ या उपकरणांनी सूर्यावरील वादळ टिपले हाेते.
या छायाचित्रांमध्ये सूर्यावरील सक्रिय भागातील सनस्पाॅट्स दिसत आहेत. या क्षेत्रांमधूनच चुंबकीय बदलांमुळे साैर वादळे निर्माण झाली हाेती. या वादळांचा पृथ्वीवरही परिणाम हाेताे.
काय सांगितले ‘इस्राे’ने?
nकाेराेनल मास इजेक्शनशी संबंधित एक्स आणि एम क्लास फ्लेअर्स अर्थात साैर लहरींमुळे भू-चुंबकीय वादळे निर्माण हाेतात. या वादळांना रेकाॅर्ड करण्यात आले आहे.
n८ ते १५ मे या कालावधीत अनेक वादळे निर्माण झाली. त्यातून ११ मे राेजी एक माेठे साैर वादळ निर्माण झाले हाेते. या वादळाची छायाचित्रे १७ मे राेजी पाठविण्यात आली हाेती.