मोठी बातमी! आदित्य-एल 1 ने सुरू केला वैज्ञानिक प्रयोग, सर्व रहस्य उलगडणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 03:05 PM2023-09-18T15:05:03+5:302023-09-18T15:05:30+5:30

Aditya-L1 Mission: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ISRO ने पाठवलेल्या यानाने प्रयोग सुरू केला आहे.

Aditya-L1 Isro: Aditya-L1 starts scientific experiment, all secrets will be revealed | मोठी बातमी! आदित्य-एल 1 ने सुरू केला वैज्ञानिक प्रयोग, सर्व रहस्य उलगडणार...

मोठी बातमी! आदित्य-एल 1 ने सुरू केला वैज्ञानिक प्रयोग, सर्व रहस्य उलगडणार...

googlenewsNext

Aditya-L1 Starts Scientific Experiments: भारतीय अंतराळ संस्था, ISRO ने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठवलेल्या आदित्य एल-1 ने मोठी बातमी दिली आहे. आदित्य-एल1 ने आपला वैज्ञानिक प्रयोग सुरू केला आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताने पाठवलेल्या पहिल्या अंतराळ-आधारित सौर वेधशाळेवरील रिमोट सेन्सिंग पेलोडने पृथ्वीपासून 50,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील सुपरथर्मल आयन किंवा अतिशय ऊर्जावान कण आणि इलेक्ट्रॉन मोजणे सुरू केले आहे.

इस्रोने X वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. इस्रोने मिशन अपडेटमध्ये म्हटले की, सुप्रा थर्मल आणि एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर (STEPS) नावाच्या उपकरणाच्या सेन्सरने वैज्ञानिक डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या डेटामुळे वैज्ञानिकांना पृथ्वीभोवतीच्या कणांचे विश्लेषण करण्यात मदत होईल.

आज रात्री आदित्य L1 पृथ्वी सोडणार 
आदित्य L1 त्याच्या मिशनचा महत्त्वाचा टप्पा सुरू करण्यासाठी सज्ज आहे. इस्रोने म्हटले की, अंतराळयान सोमवारी मध्यरात्री ट्रान्स-लॅग्रॅन्जियन पॉइंट 1 इन्सर्शन (TL1I)मधून जाईल. TL1 इन्सर्शन हे पृथ्वीच्या कक्षेतून प्रक्षेपण आहे, जे 19 सप्टेंबर रोजी IST पहाटे 2:00 वाजता केले जाईल. हे पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर्य-पृथ्वी लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) च्या अंदाजे 110 दिवसांच्या प्रवासाची सुरुवात करेल.

2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या आदित्य-एल1 मिशनचे उद्दिष्ट सूर्याचे फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि कोरोनाचा अभ्यास करणे आहे. हे अवकाशातील हवामानाची गतिशीलता आणि कणांची तपासणी करेल. अंतराळयान TL1I सह L1 बिंदूच्या दिशेने प्रवास सुरू करेल.

Web Title: Aditya-L1 Isro: Aditya-L1 starts scientific experiment, all secrets will be revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.