आदित्य L1 च्या प्रक्षेपणाचे काउंटडाउन सुरू! इस्रोची टीम मिशन मॉडेलसह श्री व्यंकटेश्वर मंदिरात पोहोचली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 01:38 PM2023-09-01T13:38:40+5:302023-09-01T13:39:13+5:30

ISRO ची महत्त्वाकांक्षी सौर मोहीम आदित्य L1 शनिवारी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित होणार आहे.

Aditya L1 launch countdown begins ISRO team reached the Sri Venkateswara temple with the mission model | आदित्य L1 च्या प्रक्षेपणाचे काउंटडाउन सुरू! इस्रोची टीम मिशन मॉडेलसह श्री व्यंकटेश्वर मंदिरात पोहोचली

आदित्य L1 च्या प्रक्षेपणाचे काउंटडाउन सुरू! इस्रोची टीम मिशन मॉडेलसह श्री व्यंकटेश्वर मंदिरात पोहोचली

googlenewsNext

भारताच चंद्रयान ३ यशस्वी झाले. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने आता माहिती पाटवण्यासही सुरुवात केली आहे. आता इस्त्रोने नवी मोहिम हात घेतली आहे. इस्त्रो आता सूर्यावरही जाणार आहे , यासाठी आदित्य L1 चे काम सुरू झाले आहे. भारताच्या पहिल्या सौर मिशन आदित्य L1 साठी काउंटडाऊन सुरू झाले आहे. इस्रोने शुक्रवारी ही माहिती दिली आहे. आदित्य-एल1 मिशनच्या मिनी मॉडेलसह इस्रोच्या वैज्ञानिकांची टीम तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यासाठी पोहोचली.

चंद्रावर जिथं कोसळलं रशियाचं लुना-25, तिथं नेमकं काय घडलं? NASA नं शोधून काढलं 

भारताची पहिली सौर मोहीम आदित्य-L1 मिशन २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केली जाईल. प्रक्षेपणाच्या तयारीची माहिती देताना इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी गुरुवारी चेन्नईत सांगितले की, “रॉकेट आणि उपग्रह तयार आहेत. आम्ही प्रक्षेपणासाठी अभ्यास पूर्ण केला आहे.

मिशन आदित्य L1 म्हणजे काय?

आदित्य-L1 अंतराळयान सूर्याच्या कक्षेचे निरीक्षण करण्यासाठी आणि L1 वरील सौर वाऱ्याचा अभ्यास करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या L1 बिंदूच्या कक्षेत, पृथ्वीपासून १५ लाख  किलोमीटर अंतरावर ठेवले जाईल.

या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण तटस्थ राहते, त्यामुळे वस्तू या ठिकाणी राहू शकतात. याला सूर्य आणि पृथ्वीच्या अंतराळातील पार्किंग पॉइंट देखील म्हणतात.

Web Title: Aditya L1 launch countdown begins ISRO team reached the Sri Venkateswara temple with the mission model

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.