चंद्रानंतर सूर्याकडे झेप; आदित्य-L1 यानाची चाचणी पूर्ण, ISRO ने दिले मोठे अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 07:13 PM2023-08-30T19:13:44+5:302023-08-30T19:15:07+5:30
ISRO Solar Mission: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोचे आदित्य-L1 मिशन 2 सप्टेंबर रोजी लॉन्च केले जाईल.
Aditya-L1 Mission Launch: भारताच्या महत्वकांशी चंद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर इस्रोची (ISRO) थेट सूर्याकडे झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या आदित्य-एल1 मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. रॉकेटची प्रक्षेपण तालीम (लॉन्च रिहर्सल) आणि तपासणी पूर्ण झाल्याची माहिती इस्रोने बुधवारी (30ऑगस्ट) दिली.
ISRO ने ट्विट(x) करुन सांगितले की, "PSLV-C57/Aditya-L1 मिशनच्या प्रक्षेपणाची तयारी सुरू आहे. प्रक्षेपणाची तालीम - वाहनाची अंतर्गत चाचणी पूर्ण झाली आहे. ही मोहीम 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केली जाणार आहे."
PSLV-C57/Aditya-L1 Mission:
— ISRO (@isro) August 30, 2023
The preparations for the launch are progressing.
The Launch Rehearsal - Vehicle Internal Checks are completed.
Images and Media Registration Link https://t.co/V44U6X2L76#AdityaL1pic.twitter.com/jRqdo9E6oM
सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली मोहीम
आदित्य-एल1 अंतराळयान सूर्याच्या सभोवतालचे वातावरण आणि एल1 (सूर्य-पृथ्वी लॅग्रेंजियन पॉइंट) वरील सौर वाऱ्याचा अभ्यास करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे यान पृथ्वीपासून अंदाजे 1.5 मिलियन किलोमीटर अंतरावर स्थिरावेल. सूर्याचा अभ्यास करणारी ही भारताची पहिलीच मोहीम आहे.
आदित्य-एल1 मिशन काय शोधेल?
'L1' भोवतीच्या कक्षेतून सूर्याचा अभ्यास करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या मते, इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आदित्य-एल1 हा राष्ट्रीय संस्थांच्या सहभागाने तयार झालेले स्वदेशी यान आहे. वेगवेगळ्या वेव्हबँड्समधील सूर्याचे फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याभोवतालच्या वातावरणाचे निरीक्षण करण्यासाठी त्यात सात पेलोड असतील.