प्रशासनाने मुख्यमंत्र्यासमोर सादर केले टंचाई आराखड्याचे नियोजन जलयुक्त शिवार योजनेबाबत व्यक्त केले समाधान : जिल्ातील पाच गावांमध्ये १०० टक्के काम झाल्याची
By admin | Published: January 21, 2016 12:04 AM2016-01-21T00:04:09+5:302016-01-21T00:04:09+5:30
जळगाव : जिल्ातील ८६७ गावांमध्ये येणार्या काळात संभाव्य पाणी टंचाई निर्माण होणार असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियोजन तयार केले आहे. त्यासाठी १९ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सप्रसंगी देण्यात आली.
Next
ज गाव : जिल्ातील ८६७ गावांमध्ये येणार्या काळात संभाव्य पाणी टंचाई निर्माण होणार असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियोजन तयार केले आहे. त्यासाठी १९ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सप्रसंगी देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल व जिल्हा परिषदेचे सीईओ आस्तिककुमार पांडेय व इतर अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्ातील दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती देण्यात आली. सद्य:स्थितीत पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये ९ टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच ६० गावातील ६० विहिरी या अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. जलयुक्त शिवार योजनेत नाशिक विभाग दुसर्या स्थानी शासनातर्फे शेतकरी हिताच्या दृष्टीने राज्यातील नाशिक विभाग हा दुसर्या स्थानी आहे. या विभागांतर्गत जळगाव जिल्हा येतो. जळगाव जिल्ातील पाच गावांमध्ये या योजनेंतर्गत १०० टक्के काम झाले आहे. ३८ टक्के गावामंध्ये ८० टक्के काम झाले असून १२६ गावांमध्ये ५० टक्क्यापेक्षा अधिक काम झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या योजनेंतर्गत कामाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ही योजना प्रभावीपणे राबविणारे पुणे विभाग पहिल्या स्थानावर आहे.