शेवगावात प्रशासन मतदानासाठी सज्ज
By admin | Published: February 15, 2017 07:08 PM2017-02-15T19:08:50+5:302017-02-15T19:08:50+5:30
शेवगाव : जि.प., पं. स. निवडणुकीची शेवगाव तालुक्यात प्रशासकीय तयारी पूर्ण झाली. बुधवारी सकाळी ९ वाजता प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा पूर्ण झाला.
Next
>दिवसभर तपासणी : नोटा बंदीनंतरच्या संशयास्पद खात्यांची तपासणीसांगली : नोटा बंदीनंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या संशयास्पद व्यवहारांची व संबंधित खात्यांची चौकशी करण्यासाठी आयकर विभागाने सोमवारी जिल्हा बँकेच्या सांगलीतील मुख्य शाखेत छापा टाकला. सरासरी प्रमाणापेक्षा जास्त उलाढाल झालेल्या २३ शाखांची तपासणी आयकर विभागामार्फत सुरू झाल्याचे समजते.आयकर विभागाच्या सात अधिकार्यांचे पथक सोमवारी दुपारी दीड वाजता बँकेत दाखल झाले. त्यांनी अचानक बँकेशी संबंधित नसलेल्या सर्व लोकांना बाहेर काढले. अधिकार्यांना तातडीने सर्व कागदपत्रे एकत्रित करण्याच्या सूचना दिल्या. तपासणीला सुरुवात झाल्यानंतर बँकेभोवती पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. येणार्या-जाणार्यांना अटकाव केला जात होता. दिवसभर या पथकाने तपासणी केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या पंधरा दिवसात नाबार्डनेही तपासणी केली होती. प्रमाणापेक्षा जास्त उलाढाल झालेल्या जिल्ातील इस्लामपूर, तासगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, सावळज, कडेगाव, विटा, मिरज मार्केट यार्ड, सांगली मार्केट यार्डसह १६ शाखांची तपासणी केली होती. याशिवाय अन्य तालुकास्तरीय शाखांचीही तपासणी करण्यात आली होती. सरासरी प्रमाणापेक्षा जास्त उलाढाल झालेल्या एकूण १९ शाखा संशयाच्या भोवर्यात सापडल्या होत्या. नाबार्डच्या पथकाने याची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल रिझर्व्ह बँकेकडे सादर केला होता. दोन टप्प्यात ही तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर याबाबतचा अहवाल आयकर विभागालाही दिला होता. ज्या खातेदारांनी एक लाखाहून अधिक रकमेचा भरणा खात्यात केला आहे, अशा सर्व खातेदारांची यादी वित्तीय आसूचना एककनेही (फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट) मागविली आहे. २0 डिसेंबर रोजी याबाबतची यादी जिल्हा बँकेने संबंधित खात्याकडे पाठवून दिली. अशा सर्व स्तरावर तपासण्या झाल्यानंतर आयकर विभागाने छापा टाकला आहे. नाबार्डने १० डिसेंबर रोजी ज्यावेळी जिल्हा बॅँकेच्या मुख्य शाखेतून जुन्या नोटांबाबतची माहिती घेतली, त्यावेळी १९ शाखांमधील जमा झालेल्या रकमा प्रमाणापेक्षा जास्त आढळून आल्या. या एकोणीस शाखांपैकी सर्वात जास्त उलाढाल असलेल्या सहा शाखांची तपासणी सुरुवातीच्या टप्प्यात झाली होती. (प्रतिनिधी)जुन्या नोटांबाबतच चौकशीजुन्या नोटा स्वीकारण्याची प्रक्रिया जिल्हा बँकेने तीन दिवस चालविली. याच कालावधित मोठ्या प्रमाणावर नोटा जमा झाल्याचा संशय नाबार्डने व्यक्त केला होता. जिल्हा बँक अध्यक्षांनी, असे कोणतेही संशयास्पद व्यवहार बँकेत झाले नसल्याचे सांगितले होते. तरीही नाबार्ड आणि वित्तीय आसूचना कार्यालयाने बँकेच्या खात्यांची तपासणी केली.तीन दिवसात तीनशे कोटी१0 नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधित एक दिवसाच्या बंदचा अपवाद वगळता, तीन दिवस जुन्या नोटा सांगली जिल्हा बँकेने स्वीकारल्या. या तीन दिवसात बँकेकडे ३00 कोटी ५ लाख १६ हजार रुपये जुन्या नोटांच्या स्वरूपात जमा झाले होते. यामध्ये १ लाख ३ हजार ८0४ व्यक्तिगत खातेदारांनी २0८ कोटी ७१ लाख १५ हजार रुपये, व्यक्तिगत कर्जदारांनी ३१ कोटी ६६ लाख ३४ हजार रुपये, तर संस्थांकडून ५९ कोटी ६७ लाख ६७ हजार रुपये जमा केले आहेत. मोबाईल बंदअधिकारी, कर्मचार्यांचे मोबाईल दुपारपासून बंद होते. बँकेचा मुख्य दरवाजा वगळता बाहेर जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. बँकेत दुपारपासून कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे दिवसभर बँकेच्या आवारात स्मशानशांतता दिसत होती. रात्री उशिरापर्यंत खात्यांच्या तपासणीचे काम सुरू होते.