स्वच्छ भारत अभियानाचा प्रशासनाकडून ब्याबोळ
By admin | Published: February 2, 2016 12:15 AM2016-02-02T00:15:47+5:302016-02-02T00:15:47+5:30
सारांश
Next
स रांशजळगाव-स्वच्छ भारत अभियानाचा मनपा प्रशासनाकडून ब्याबोळ होत असून शहरात योग्य पद्धतीने साफसफाई होत नसल्याचा तसेच योग्य नियोजनही नसल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केला आहे. केंद्र सरकारने १४व्या वित्त आयोगाअंतर्गत सफाईच्या कामासाठी निधी दिला आहे. मात्र त्यातून आवश्यक वाहने खरेदी करून सफाईचे काम चांगले करण्याकडे दूर्लक्ष होत असल्याचा आरोपही सोनवणे यांनी केला आहे. जळगाव रत्न पुरस्कारांचा मनपाला विसरजळगाव-मनपाने १३ मार्च २०१४ रोजी स्व.डॉ.अविनाश आचार्य यांना जळगाव रत्न पुरस्कार जाहीर केला होता. परंतू अद्यापही त्याचे वितरण झालेले नाही. तसेच शहरातील इतर मान्यवरांना सुद्धा २००६ सालीच हा पुरस्कार देण्याचे प्रस्ताव आले होते. मात्र अद्यापही या पुरस्कारांचे वितरण झालेले नाही. मनपाला या पुरस्काराचा विसर पडल्याची टीका भाजपा नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी केली आहे.४६९ धार्मिक स्थळांबाबत अहवाल मागविलाजळगाव-मनपाने २००९ पूर्वीच्या ४६९ धार्मिक स्थळांबाबत कायदा व सुव्यवस्था, लोकमान्यता या आधारे या धार्मिक स्थळांचे नियमितीकरण करावे की निष्कासन करावे? याबाबत पोलीस विभागाकडे अहवाल मागविला आहे. विकास आराखड्याच्या अनुषंगाने नगररचना विभागाचेही मत मागविण्यात आले आहे. तसेच हे बांधकाम नियमित करावे की निष्कासीत करावे? याबाबत जमीन धारकांचे मत मागविण्यात आले आहे.