अॅडमिरल सुनील लांबांनी स्वीकारला नौदल प्रमुखाचा पदभार
By admin | Published: May 31, 2016 03:50 PM2016-05-31T15:50:13+5:302016-05-31T15:50:13+5:30
अॅडमिरल सुनील लांबा यांनी आज भारतीय नौदल सेनेच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31- अॅडमिरल सुनील लांबा यांनी आज भारतीय नौदल सेनेच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. एडमिरल आर. के. धवन हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी या पदाची जबाबदारी आता सुनील लांबा यांना देण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय समुद्राच्या सीमेची सुरक्षा कडेकोट करण्याला प्राथमिकता देणार असल्याचं यावेळी सुनील लांबा यांनी सांगितलं.
अॅडमिरल लांबा नौसेनेचे प्रमुख होण्याआधी नौसेनेच्या पश्चिम भागाची जबाबदारी सांभाळत होते. 1 जानेवारी 1978ला ते भारतीय नौसेनेत सामील झाले. नौसेनेमध्ये 38 वर्षांच्या प्रवासात त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. त्यांना अनेक पदकं आणि पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आलं आहे. नेव्हिगेशन अधिकारी म्हणून त्यांनी आइएनएस सिंधू आणि आयएनएस दुनागिरीवर त्यांनी सेवा बजावली आहे. याशिवाय त्यांनी चार लढाऊ युद्धनौका आयएनएस काकीनाडा, आयएनएस हिमगिरी, आयएनएस रणविजय आणि आयएनएस मुंबईचे प्रमुखपद भूषवले आहे.