निगेटिव्ह प्रमाणपत्रानंतरच मतमोजणी केंद्रात प्रवेश; निवडणूक आयोगाचे उमेदवारांसाठी आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 05:31 AM2021-04-29T05:31:34+5:302021-04-29T06:37:30+5:30
पश्चिम बंगाल, पुदुचेरी, तामिळनाडू, केरळ, आसाम येथे झालेल्या विधानसभा निवडणुकांतील उमेदवारांसाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांतील उमेदवारांनी कोरोनाची बाधा झाली नसल्याचे प्रमाणपत्र किंवा कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र २ मे रोजी मतमोजणी आधी सादर करावे. अन्यथा या उमेदवारांना मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार नाही असा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. पश्चिम बंगाल, पुदुचेरी, तामिळनाडू, केरळ, आसाम येथे झालेल्या विधानसभा निवडणुकांतील उमेदवारांसाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या दणक्यानंतर सुबुद्धी
नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या राजकीय प्रचार मोहिमा विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणतेही पाऊल न उचलल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने आपले हातपाय हलवून प्रचार सभांवर काही निर्बंध लादले.