शाळांत चार लाख मुलांचे प्रवेश बोगस; अधिकाऱ्यांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 12:02 PM2024-06-30T12:02:45+5:302024-06-30T12:03:03+5:30

हरयाणातील प्राथमिक शाळांमध्ये चार लाख मुलांना बनावट प्रवेश दिल्याचे प्रकरण समोर आले.

Admission of four lakh children in schools is bogus Offense against authorities | शाळांत चार लाख मुलांचे प्रवेश बोगस; अधिकाऱ्यांवर गुन्हा

शाळांत चार लाख मुलांचे प्रवेश बोगस; अधिकाऱ्यांवर गुन्हा

बलवंत तक्षक

लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड : हरयाणातील प्राथमिक शाळांमध्ये चार लाख मुलांना बनावट प्रवेश दिल्याचे प्रकरण समोर आले असून, सीबीआयने प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पंजाब-हरयाणा हायकोर्टाने २०१९ मध्ये सीबीआयला चौकशीचा आदेश दिला होता. पाच वर्षांनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरयाणाच्या सरकारी शाळांमध्ये चार लाखांचे बनावट प्रवेश आणि त्यांच्या नावावर निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  २०१६ मध्ये जेव्हा हरयाणा सरकारने कंत्राटी शिक्षकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी याचिका दाखल केली होती, तेव्हा ही बाब उच्च न्यायालयासमोर आली होती.

Web Title: Admission of four lakh children in schools is bogus Offense against authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.