पाटणा रेल्वे स्थानकावर अचानक सुरू झाला पॉर्न video; ॲडल्ट स्टार्स म्हणाली, ही मीच आहे...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 07:02 PM2023-03-21T19:02:42+5:302023-03-21T19:03:39+5:30
रविवारी बिहारच्या पाटणा रेल्वे स्थानकावरील टीव्ही स्क्रीनवर अचानक एक पॉर्न व्हिडीओ सुरू झाल्याने एकच खळबळ माजली.
पाटणा : रविवारी बिहारच्या पाटणा रेल्वे स्थानकावरील टीव्ही स्क्रीनवर अचानक एक पॉर्न व्हिडीओ सुरू झाल्याने एकच खळबळ माजली. यानंतर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. याप्रकरणी एका प्रसिद्ध पॉर्न स्टारने एक मजेशीर ट्विट केले आहे. ट्विटचा आनंद घेत तिने लिहिले की, व्हिडीओ क्लिप माझी आहे.
पॉर्न स्टार केंद्र लस्टने मंगळवारी तिचा फोटो ट्विट करत लिहले, "भारत #BiharRailwayStation...". याशिवाय तिने या ट्विटमध्ये कशाचाही उल्लेख केलेला नाही. यानंतर सर्व युजर्स कमेंट सेक्शनमध्ये ट्विट करू लागले. काही युजर्संनी विचारले की ती क्लिप तुझी आहे का? केंद्र लस्टने यावर लिहिले, "मला आशा आहे की तो माझाच आहे." आता या पॉर्न स्टारचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे.
केंद्र लस्ट सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ट्विटरवर तिचे 1.5 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच इंस्टाग्रामवर 85 लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात.
India 🇮🇳#BiharRailwayStationpic.twitter.com/R2Mxfbfarc
— Kendra Lust™ (@KendraLust) March 20, 2023
Ayee hayeee 😍
— SagniK (@sag__nik__) March 21, 2023
Aab toh plan goa manali ka nhi patna junction janeka banegaa 😝😗
Let's go boys 😉#patnajunction@KendraLust 😗 pic.twitter.com/t9EZH7XI3r
पटना जंक्शन पर आज कुछ भी हुआ उस पर खुद बिहार के लोग Memes बना रहे हैं, कितनी शर्म की बात है...
— Khushboo Chaudhary (@khushbuChy) March 20, 2023
जवळपास 3 मिनिटे चालला video
बिहारच्या पाटणा रेल्वे स्थानकावर जवळपास तीन मिनिटे अश्लील व्हिडीओ चालू असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांकडून जाहिरात एजन्सीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. तसेच डीआरएम प्रभात कुमार यांनी एजन्सीला दंड ठोठावला आहे. एवढेच नाही तर करार देखील रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.
याआधी देखील घडली अशी घटना
पाटना जंक्शनच्या जवळपास सर्व प्लॅटफॉर्मवर डझनभर टीव्ही स्क्रीन लावण्यात आल्या आहेत, जेणेकरून प्रवाशांना ट्रेनची माहिती देता येईल. रविवारी घडलेली ही घटना काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील अशा घटना समोर आल्या आहेत. त्यावेळी अधिकाऱ्यांना नंतर कळले. मात्र यावेळी माहिती मिळताच रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे. कालची संपूर्ण घटना सकाळी 9.56 ते 9.59 या वेळेत प्लॅटफॉर्म क्रमांक दहावर झाली असल्याचे रेल्वे अधिकारी सांगत आहेत. तर काही प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरही अशी घटना घडली असल्याचे म्हणत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"