राष्ट्रपतिपदासाठी अडवाणींचे पोस्टर्स
By admin | Published: June 19, 2017 01:21 AM2017-06-19T01:21:34+5:302017-06-19T01:21:34+5:30
भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा उमेदवार कोण, या हालचालींना सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात वेग आला असतांना, लालकृष्ण अडवाणी हेच राष्ट्रपतीपदासाठी सर्वात
सुरेश भटेवरा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा उमेदवार कोण, या हालचालींना सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात वेग आला असतांना, लालकृष्ण अडवाणी हेच राष्ट्रपतीपदासाठी सर्वात उपयुक्त व श्रेष्ठ उमेदवार असल्याचे पोस्टर्स रविवारी अचानक भाजपचे मुख्यालय असलेल्या अशोका रोडवर, संसदेकडे जाणाऱ्या रायसीना मार्गासह अनेक ठिकाणी झळकले. तथापि मुख्यालयाच्या भिंतीवर लागलेले हे पोस्टर्स काही तासातच फाडून त्यांना केराची टोपली दाखवण्यात आली.
राष्ट्रपतीपदासाठी लालकृष्ण अडवाणींचे नाव गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे.
जोडीला मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज यांची नावेही चर्चिली गेली. राजधानीच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा विषय केंद्रस्थानी असतांना, अचानक अडवाणींच्या नावाचे समर्थन करणारे पोस्टर्स रविवारी झळकले. पोस्टर्सवरील मजकूरात‘भारतीय जनता पक्षाचे जनक, लोहपुरूष तथा भारताच्या राष्ट्रीय राजकारणातले आदरणीय नेते लालकृ ष्ण अडवाणी हेच राष्ट्रपतीपदासाठी सर्वाधिक उपयुक्त व श्रेष्ठ उमेदवार आहेत’ असा उल्लेख आहे.
पोस्टर्स प्रायोजित करणाऱ्याचे नाव अशोक तंवर आहे.
जो स्वत: ला गुजर समाज तथा किसान नेत्यांचा संयोजक म्हणवतो.
तथापि तंवर यांच्या पोस्टर्सवरील प्रस्तावाला काही तासातच
केराची टोपली मिळाल्यामुळे
अडवाणी यांचे नाव
सत्ताधाऱ्यांच्या अग्रक्रमातून खरोखर बाद झाले काय? याची चर्चा मात्र
सुरू झाली.