एक लाख रुपयांच्या कर्जफेडीसाठी बायकोच्या विक्रीचा प्रयत्न, फेसबुकवर केली जाहिरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2016 11:08 PM2016-03-07T23:08:08+5:302016-03-08T06:52:52+5:30
आपल्यावर झालेले एक लाख रुपयांचे कर्ज फेडायचे असल्याने मी माझ्या बायकोची विक्री करू इच्छित असल्याची पोस्ट स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवर टाकणाऱ्या इसमाविरुद्ध इंदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून
इंदूर : आपल्यावर झालेले एक लाख रुपयांचे कर्ज फेडायचे असल्याने मी माझ्या बायकोची विक्री करू इच्छित असल्याची पोस्ट स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवर टाकणाऱ्या इसमाविरुद्ध इंदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
दिलीप माळी नावाच्या इसमाने कर्जमुक्त होण्यासाठी टाकलेल्या पोस्टविरोधात बायकोनेच तक्रार केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. तिच्या नातेवाईकाने फेसबुकवर हा मजकूर पाहिला आणि ताबडतोब ही माहिती तिला कळवली. या महाभागाने आपल्या बायकोचे दोन वर्षाच्या मुलीबरोबरचे छायाचित्रही फेसबुकवर टाकले. आपल्या डोक्यावर लोकांचे एक लाख रुपयांचे कर्ज आहे आणि ते फेडण्यासाठी आपण हे करीत आहोत, असे त्याने फेसबुकवर नमूद केले होते.
दिलीप माळीचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर हे दाम्पत्य इंदूरला राहायला आहे. तिथे त्याने अनेक जणांकडून कर्ज घेतले होते. ते पैसे परत द्यावेत, यासाठी अनेकांनी त्याच्यामागे तगादा लावला होता. (वृत्तसंस्था)