देशातील १८ कोटी ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचा केंद्राचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 03:04 AM2020-04-15T03:04:11+5:302020-04-15T03:04:54+5:30

एम्सचा वार्धक्यशास्त्र विभाग : केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाकडूनही मार्गदर्शन

Advice from the Center to provide special care to 5 crore senior citizens in the country | देशातील १८ कोटी ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचा केंद्राचा सल्ला

देशातील १८ कोटी ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचा केंद्राचा सल्ला

Next

मुंबई/औरंगाबाद : केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय व नवी दिल्ली येथील एम्सच्या वार्धक्यशास्त्र विभागाने सोमवारी कोविड -१९ महामारीच्या साथीमध्ये देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली. संकटाच्या या काळात सुरक्षित कसे राहावे. त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यासंबंधी काही मार्गदर्शक तत्त्वे यात निश्चित केली. मंत्रालयाचे सचिव आर. सुब्रह्मण्यम यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून सर्व जिल्ह्यांत या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यास सांगितले आहे.

या पत्रात म्हटल्यानुसार, २०११ च्या जनगणनेच्या वयोगटाच्या आकडेवारीनुसार देशात अंदाजे १६ कोटींपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. ६० ते ६९ वयोगटात ८ कोटी ८० लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. ७० ते ७९ मध्ये ६ कोटी ४० लाख, तर काळजीवाहूंची गरज असलेल्या (ज्यांचे वय ८० वर्षांपेक्षा अधिक आहे) नागरिकांची संख्या २ कोटी ८० लाख आहे. देशात निराधार किंवा कुटुंब सांभाळत नसलेल्या ज्येष्ठांची संख्या १८ लाख आहे. असे देशात एकूण १८ कोटी १८ लाख ज्येष्ठ आहेत. या नागरिकांना कोविड-१९ च्या काळात धोका अधिक वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे काळजीवाहू यांच्यासाठी दिलेली ही अ‍ॅडव्हायझरी या काळात त्यांचा धोका कमी करण्यात उपयोगी पडणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

हे कोणासाठी
आहे?
च्६० वर्षे व त्याहून अधिक, विशेषत: उपरोक्त वैद्यकीय स्थिती असलेले
च्दमा, श्वसनात तीव्र अडथळ््यांचे दीर्घकालीन श्वसन रोग
च्फुफ्फुसाचे आजार (सीओपीडी), ब्रॉन्काइकेटेसिस,
च्तीव्र हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग
च्मूत्रपिंडाचा आजार, अल्कोहोलिक आजार
च्व्हायरल हिपॅटायटिससारखा तीव्र यकृत रोग
च्पार्किन्सन, स्ट्रोकसारखी तीव्र न्यूरोलॉजिकल स्थिती

हे करा
संपूर्ण वेळ घरात राहून अभ्यागतांना भेटणे टाळा
कोणालाही भेटताना एक मीटर अंतर पाळा
एकटेच राहत असल्यास निरोगी काळजीवाहू निवडा
कोणत्याही परिस्थितीत लहान, मोठी संमेलने पूर्णपणे टाळा
घरात असताना मोबाईल जवळ ठेवा
घरीच हलका व्यायाम आणि योग करण्याचा विचार करा
जेवण करण्यापूर्वी, वॉशरूम वापरल्यानंतर वीस सेकंद हात धुवा

मोबाईल असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी
वारंवार स्पर्श केलेला चष्मा, मोबाईल, काठी आदी वस्तू स्वच्छ करा
शिंंकताना- खोकताना टिशू पेपर किंवा रुमालाचा वापर करा
घरी शिजवलेले ताजे गरम जेवण घ्या
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रस प्या
दररोज लिहून दिलेली औषधे नियमितपणे घ्या
ताप, खोकला, श्वासास अडचणी आल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा
शक्यतो डॉक्टरांशी फोनवर बोलून रुटीन उपचार सुरू ठेवा.

आपल्या कुटुंबातील सदस्यांशी बोला
नातेवाईक, मित्रांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगवर बोला
आवश्यक असल्यास
कुटुंबातील सदस्यांकडून मदत घ्या
उन्हाळ््यामुळे, डिहायड्रेशन टाळा. पाण्याचा पुरेसा वापर करा.

हे करू नका
ताप, सर्दी - खोकला, श्वसन विकार असणाऱ्यांच्या जवळ जाणे
मित्र, परिवाराच्या गळाभेटी, हस्तांदोलन, जवळून संपर्क
गर्दीची ठिकाणे, उद्याने, बाजारपेठा, धार्मिक ठिकाणी जाणे
हातावर खोकणे, शिंंकणे
डोळे, चेहरा नाकावर वारंवार हात लावणे
मनाने औषधोपचार, नियमित चेकअपसाठी रुग्णालयात जाणे
नातेवाईकांना घरी बोलावणे

Web Title: Advice from the Center to provide special care to 5 crore senior citizens in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.