मास्क न लावल्याने झाली 500 रुपयांची शिक्षा, वकिलानं मागितली 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई
By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 20, 2020 02:22 PM2020-09-20T14:22:18+5:302020-09-20T14:31:18+5:30
राजधानी दिल्लीत पोलिसांनी एका व्यक्तीला कारमध्ये मास्क न लावल्याने 500 रुपयांची शिक्षा केली. यावर त्या व्यक्तीने आता 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. एवढेच नाही, तर मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईही केली जात आहे. मात्र, राजधानी दिल्लीतपोलिसांनी एका व्यक्तीला कारमध्ये मास्क न लावल्याने 500 रुपयांची शिक्षा केली. यावर त्या व्यक्तीने आता 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.
संबंधित व्यक्ती राजधानी दिल्लीत कारने प्रवास करत होती. महत्वाचे म्हणजे ती व्यक्ती कारमध्ये एकटीच होती. मात्र मास्क न लावल्याने पोलीसाने तिला रोखले आणि 500 रुपयांची शिक्षा केली. यानंतर संबंधित व्यक्तीने यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली असून केवळ शिक्षेची रक्कमच परत मागितली नाही, तर नुकसानभरपाई म्हणून 10 लाख रुपये मागितले आहेत.
माध्यमांतील वृत्तानुसार, दिल्लीतील सौरभ शर्मा हे पेशाने वकील आहेत. ते 9 सप्टेंबरला आपल्या कारने एकटेच जात होते. त्यांनी मास्क लावलेले नव्हते. याच वेळी येथील गीता कॉलनीजवळ पोलिसाने त्यांना अडवले आणि 500 रुपयांची शिक्षा केली. यावेळी सोरभ पोलिसाला म्हणाले, कारमध्ये एकट्याने प्रवास करताना मास्कची आवश्यकता नाही. मात्र, पोलिसांनी त्यांचे ऐकले नाही आणि त्यांच्याकडून दंड वसूल केला.
यानंतर आता, सौरभ यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांकडून केवळ शिक्षेची रक्कमच नाही, तर 'मानसिक छळ' केल्याचा आरोप करत नुकसानभरपाई म्हणून दहा लाख रुपये मागितले आहेत. ‘कार त्यांचे खासगी क्षेत्र आहे आणि त्यामुळे एकट्याने प्रवास करताना मास्क लावण्याची तुलना, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याशी केली जाऊ शकत नाही,’ असे सौरभ यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न! व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वीच पकडलं विषाचं पाकीट
केंद्र सरकारच्या 3 योजना, केवळ 400 रुपयांत सुरक्षित होईल भविष्य
भारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन
"झोपेत घोरत असाल तर सावधान! कोरोनामुळे मृत्यूचा तिप्पट धोका"
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी