ऐन दिवाळीत पाण्यासाठी पायपीट
By admin | Published: November 15, 2015 09:13 PM2015-11-15T21:13:43+5:302015-11-15T21:13:43+5:30
ग्रामस्थांचे हाल : दोन-दोन नळ-पाणीपुरवठा योजना असून फायदा नाही
Next
ग रामस्थांचे हाल : दोन-दोन नळ-पाणीपुरवठा योजना असून फायदा नाहीपाईट : दोन-दोन नळ-पाणीपुरवठा योजना शिवाय भामाआसखेड धरण उशाला तरीही कोरड घशाला अशी अवस्था पाईट येथील ग्रामस्थांची झाली आहे. ऐनदिवाळीमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागली आहे.पाईट येथे नियोजनाचा अभाव आणि वीज वितरण कंपनीकडून पुरेशा दाबाने मिळत नसलेली वीज यामुळे येथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी मोठे हाल झाले आहेत.पाईटकरांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रथम सन २००९-१० मध्ये ६३ लाख रुपयांच्या इंडो-जर्मन नळ-पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेमधून सुरुवातीस पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत होता. परंतु विहीर ते पाण्याची टाकी हे अंतर ५ किमी असून सुरुवातीस ६ तास पाण्याची टाकी भरण्यास लागत असलेला वेळ लाईनमधील दुर्लक्षित पाण्यामुळे व लाईन काही लोकांनी घेतलेल्या जोडमुळे आता आठ तासांतही भरत नसल्याने खरी समस्या निर्माण झाली आहे. खरे तर ग्रामपंचायतीने या समस्येकडे लक्ष दिले असते, तरीही ग्रामस्थांना योग्य दाबाने पाणी मिळाले असते. या योजनेवर खरे तर या योजनेच्या दुरुस्तीवर लक्ष द्यावयाची गरज असताना ८ महिन्यांपूर्वी २९ लाख रुपयांची दुसरी योजना करून पाण्याची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु ही योजना असून नसल्यासारखी झाली असून या योजनेमधून फक्त वापरण्यासाठी पाणी आणण्याचा उद्देशही सफल झाला नाही. एक वर्षानंतरही या योजनेचे अजून वीजजोड ग्रामपंचायतीने घेतला नसल्याने या योजनेचा काहीही उपयोग झाला नसल्याचे उघड होत आहे. चौकटअद्याप तक्रार नाही आली८ महिन्यांच्या आतच या योजनेने काही पाईप जमीन सपाटीकरणामध्ये तुटले असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. तसेच लवकरच दुरुस्त करून ती लाईन पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगण्यात येत असले तरीही याबाबत तक्रार मात्र केली नसल्याचे ग्रामसेवकाने सांगितले आहे. यामध्ये सर्वात मोठे दुर्दैव असे, की कोणीही येवो पाईटकरांच्या पिण्याच्या पाण्याचा शाप असल्याची भावना ग्रामस्थांची झाली असून ऐन सणासुदीत ग्रामस्थांवर पाण्यासाठी धावपळ करायला लागते ती लागतेच.याबाबत गेल्या १० तारखेपासून वीजवितरणकडून लोडशेडिंग बंद असले तरी मध्ये मध्ये ट्रीप होत असलेल्या लाईनमुळेही थोडाफार परिणाम होत आहे. याबाबत ग्रामसेवक सुरेश घनवट यांनी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी बसविण्यात आलेल्या यंत्रणा व्यवस्थित न बसविल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्यास अडचण येत असून एक ज्यादा कर्मचारी लावून तो लवकरच सुरळीत करण्यात येईल, असे सांगितले.कोट१० तारखेपासून लोडशेडिंग बंद असून नळ-पाणीपुरवठा असलेल्या फिडरला काल थ्री फेज लाईन नसतानाही ४ तास वीजपुरवठा सोडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही ग्रामपंचायतीस हवे ते सहकार्य वीजमंडळ करेल.- आर. असोले, उपअभियंता, वितरण कंपनी