है तैय्यार हम... एअर मार्शल धनोआंकडून वायू दलास सतर्कतेच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 03:20 PM2019-08-20T15:20:16+5:302019-08-20T15:23:45+5:30
जम्मू काश्मीरमधील केंद्र सरकारची पावलं आणि कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे
मुंबई - भारताने कलम 370 हटविल्याच्या पार्श्वभूमीवर सीमारेषेवर तणावाचे वातावरण तयार झाले आहे. तर, इम्रान खान यांच्या पोकळ धमक्यांना भारताने कसलिही भीक घातली नाही. त्यामुळे पाकिस्तान सरकार सैरभैर झालं आहे. आम्ही युद्धजन्य स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज आहोत, असे उद्गार पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी म्हटले होते. त्यांच्यासमवेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी हेही होते. त्याला राजनाथसिंह यांनी त्याच भाषेत उत्तर दिले होते. त्यानंतर, आता एअर मार्शल धनोआ यांनीही सज्ज असल्याचं म्हटलंय.
जम्मू काश्मीरमधील केंद्र सरकारची पावलं आणि कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. इम्रान खान सरकारने पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ 3 वर्षांसाठी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाक पंतप्रधान कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी इम्रान खान यांनी हा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमुळे पाकिस्तान सरकारने घेतलेला हा निर्णय महत्वाचा आहे. अलिकडेच पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र संघात फटकारण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर प्रकरणावर पाकिस्तानला चीनशिवाय इतर कोणत्याही देशांनी पाठिंबा दिला नाही. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय वायू दलाचे प्रमुख एअर मार्शल बीएस. धनोआ यांनी वायू दलाला सतर्क आणि सावधानतेचा इशारा दिला आहे.
सीमारेषेवरील तणाव लक्षात घेता, वायू दलास अलर्ट राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. भारतीय वायू सेना नेहमीच तयारीत असते. शत्रूराष्ट्राचा हवाई हल्ला परतविण्यासाठी आम्ही नेहमी सज्ज असून आपली वायू सेना तत्पर आहे. केवळ युद्धासाठीच नाही, तर इतर वेळीही वायू दलाचे विमान सज्ज असते, असे धनोआ यांनी सांगितले. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना धनोआ यांनी वायू दल सतर्क आणि सज्ज असल्याचं म्हटलंय. दरम्यान, गेल्याच आठवड्यात लष्करप्रमुख बिपीन रावत यांनीही भारतीय सैन्य आपल्या पोजीशनमध्ये असून सध्या सीमारेषेवर शांत वातावरण असल्याचं म्हटलं होतं.
IAF cautious and alert, says Air Chief BS Dhanoa amid Indo-Pak tensions
— ANI Digital (@ani_digital) August 20, 2019
Read @ANI story | https://t.co/ycImydK4mgpic.twitter.com/bPrpNsvsDO