मोदी सरकारच्या 'या' योजनेअंतर्गत 1000 रुपये भाड्याने मिळणार घर; जाणून घ्या कोणाला, कसा होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 08:41 AM2020-06-22T08:41:55+5:302020-06-22T08:52:50+5:30

मोदी सरकारकडून जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्यूवल मिशन आणि राजीव आवास योजना या योजनांअंतर्गत वापरात नसलेल्या 1 लाख हाऊसिंग यूनिट्सना यामध्ये वापरण्याची योजना तयार करण्यात येत आहे.

affordable rental house rs 1000 per month under rental housing scheme | मोदी सरकारच्या 'या' योजनेअंतर्गत 1000 रुपये भाड्याने मिळणार घर; जाणून घ्या कोणाला, कसा होणार फायदा

मोदी सरकारच्या 'या' योजनेअंतर्गत 1000 रुपये भाड्याने मिळणार घर; जाणून घ्या कोणाला, कसा होणार फायदा

Next

नवी दिल्ली - सध्या देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. याच दरम्यान आता बांधकाम मजूर, कामगार, प्रवासी मजूर अशा असंघटीत क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकार रेंटल हाऊसिंग योजना लवकरच आणू शकते. विद्यार्थी देखील या योजनेचा फायदा घेऊ शकतात. केंद्र सरकार द्वारे निधी पुरवण्यात येणाऱ्या या भाडेतत्त्वावरील गृह योजनेमध्ये वेगवेगळ्या वर्गासाठी एक ते तीन हजारांपर्यंत भाडे आकारण्यात येईल. गृहनिर्माण मंत्रालयाने या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 700 कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे. 

मोदी सरकारकडून जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्यूवल मिशन आणि राजीव आवास योजना या योजनांअंतर्गत वापरात नसलेल्या 1 लाख हाऊसिंग यूनिट्सना यामध्ये वापरण्याची योजना तयार करण्यात येत आहे. द प्रिंटच्या एका रिपोर्टनुसार, यूपीए सरकारच्या कार्यकाळात जी स्वस्त भाडेतत्वावरील गृह योजना आणण्यात आली होती, त्याचा वापर प्रवासी मजूरांसाठी करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात घोषणा केली होती.

द प्रिंटने यासंबंधित असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात एक मसुदा तयार करून मंत्रालय विविध घटकांसाठी 1000 रुपये ते 3000 रुपये यादरम्यान भाडे आकारण्यात येईल. यामध्ये बांधकाम मजूर, कामगार, प्रवासी मजूर अशा असंघटीत क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना देखील कमी दरामध्ये घर उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र याबाबत अद्याप कोणातही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. 

CNBC आवाजला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेंटल हाऊसिंग योजनेसाठी कॅबिनेट नोट तयार करण्यात आली आहे. या कॅबिनेट नोटला  गृहमंत्रालयाकडून देखील मंजूरी मिळाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव कॅबिनेटकडे पाठवण्यात येईल. या योजनेअंतर्गत कंपन्यांना त्यांच्या जमिनीवर रेंटल हाऊसिंग प्रकल्पासाठी इन्सेंटिव्ह मिळेल. रेंटल हाउसिंग योजनेअंतर्गत PPP मॉडेलवर हा प्रकल्प बनवण्यात येईल. VGF अंतर्गत देखील प्रकल्प बनवण्यात येणार आहे. यासाठी पंतप्रधान शहरी आवास योजनेअंतर्गत फंड उपलब्ध केला जाऊ शकतो अशी देखील माहिती मिळत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये जवळपास 75000 यूनिट बनवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे असं देखील यामध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

गुगलने प्ले स्टोरवरुन हटवले 'हे' 30 अ‍ॅप्स; स्मार्टफोनमध्ये असल्यास त्वरीत करा डिलीट अन्यथा...

India China Faceoff : "राहुल गांधींनी यामध्ये राजकारण करू नये", जखमी जवानाचे वडील म्हणतात...

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येने रेकॉर्ड मोडला, चिंता वाढवणारी आकडेवारी

इच्छाशक्तीची गरज! भारत चीनला देऊ शकतो तब्बल 17 अब्ज डॉलरचा जबरदस्त झटका

CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्यात 'हे' औषध प्रभावी ठरणार; संक्रमण रोखण्यास मदत करणार

Web Title: affordable rental house rs 1000 per month under rental housing scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.