CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 05:13 PM2020-07-23T17:13:39+5:302020-07-23T17:26:16+5:30
गेल्यावर्षीच संसदेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 मंजूर करण्यात आला. यात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मांतील नागरिकांसाठी सुलभ नियम तयार करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यापासून (CAA) बचाव व्हावा यासाठी भारतात राहणाऱ्या अफगाण आणि रोहिंग्या मुस्लिमांनी धर्मांतर करायला सुरुवात केली आहे. भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग सोपा व्हावा, यासाठी ते ख्रिश्चन धर्मात प्रवेश करत आहेत. केंद्रीय संस्थांनी यासंदर्भात सरकारलादेखील माहिती दिली आहे. किमान 25 अफगाण मुस्लिमांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असल्याचे या संस्थांना आपल्या तपासात आढळून आल्याचे समजते. यासंदर्भात द इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे.
CAA मध्ये 3 देशांतील नागरिकांसाठी सुलभ कायदे -
गेल्यावर्षीच संसदेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 मंजूर करण्यात आला. यात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मांतील नागरिकांसाठी सुलभ नियम तयार करण्यात आले आहेत. यापूर्वी एखाद्या व्यक्तीला भारताचे नागरिकत्व हवे असेल तर, किमान 11 वर्ष येथे राहणे आवश्यक होते. मात्र, हा कालावधी आता शिथील करून एक ते सहा वर्ष करण्यात आला आहे. याचाच अर्थ या तीनही देशांतील वर उल्लेख केलेल्या सहा धर्मांतील कोल जर एक ते सहा वर्षांपासून भारतात येऊन राहत असतील, तर त्यांना भारताचे नागरिकत्व मिळू शकेल. अद्याप केंद्रीय गृह मंत्रालयाला CAA 2019 चे नियम नोटिफाय करायचे आहेत.
'अणेक मुस्लीमांची ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची इच्छा' -
दक्षिण दिल्लीच्या अफगाण चर्चमध्ये जाणाऱ्या आबिद अहमद मॅक्सवेल यांनी ईटीसोबत बोलताना सांगितले, 'CAA कायदा मंजूर झाल्यापासून अफगाणिस्तानातून आलेल्या अनेक मुस्लिमांची ख्रश्चन धर्मात प्रवेश करण्याची इच्छा आहे.' 34 वर्षीय मॅक्सवेल 21 वर्षांचे होते तेव्हा भारतात आले होते. त्यांचे आई-वडील सुन्नी मुस्लीम होते आणि अफगाणिस्तानातील काबूल नजीक राहत होते. त्यांनी सांगितले, की जास्तीत जास्त अफगाणिस्तानातील मुस्लिमांनी संयुक्त राष्ट्राच्या हाय कमिश्नर फॉर रिफ्यूजीकडे (UNHCR) शरण मिळावी यासाठी अर्ज केला आहे.
जवळपास 1.60 लाख अफगाणी मुस्लिमांचे भारतात वास्तव्य -
आधिकृत आकडेवारीनुसार, जवळपास 1.50 लाख ते 1.60 लाख अफगाण मुस्लीम दिल्लीच्या पूर्व कैलास, लाजपत नगर, अशोक नगर आणि आश्रम येथे राहतात.
अनेक रोहिंग्या स्वतःला बांगलादेशी सांगतात -
याशिवाय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की जवळपास 40 हजार रोहिंग्या मुस्लीम संपूर्ण भारतात राहतात. जम्मू-काश्मीरमध्ये ही सख्या सर्वाधिक आहे. रोहिंग्या मुस्लीम मोठ्या प्रमाणावर 2012पासून देशात राहतात आणि आता स्वतःला बांगलादेशी असल्याचे सांगत असून, ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करत आहेत.
गेल्या 6 वर्षांत भारताने अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या जवळपास 4 हजार लोकांना नागरिकत्व दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
युद्धाचे ढग! अमेरिकेनं दिला दूतावास बंद करण्याचा आदेश; चीनची पलटवार करण्याची धमकी
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?
आई शप्पथ!...रशियातील काही उद्योगपती, नेत्यांनी एप्रिलमध्येच घेतली कोरोनावरील लस