Afghanistan Crisis: १६८ जणांना घेऊन भारतीय हवाई दलाचं विमान भारतात दाखल, आणखी एक विमान ८७ भारतीयांना घेऊन रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 10:42 AM2021-08-22T10:42:10+5:302021-08-22T10:42:43+5:30
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थीती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. अशाच अफगाणिस्तानातील भारतीयांना मायदेशी आणण्याचं मिशन भारतीय हवाई दलानं हाती घेतलेलं आहे.
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवरतालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थीती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. अशाच अफगाणिस्तानातील भारतीयांना मायदेशी आणण्याचं मिशन भारतीय हवाई दलानं हाती घेतलेलं आहे. यात भारतीय हवाई दलाला मोठं यश आलं आहे. भारतीय हवाई दलाचं सी-१७ विमान आज सकाळी काबुलहून १६८ जणांना घेऊन भारतात दाखल झालं आहे. गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर वायुसेनेचं हे विमान उतरलं आहे. याठिकाणी वायुसेनेकडून सर्व नागरिकांच्या उतरविण्यात आलं असून त्यांची सर्व काळजी वायुसेनेकडून घेतली जात आहे. यात अनेक लहान मुलं, महिला आणि अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासात काम करणाऱ्यांचाही समावेश आहे.
Evacuation continues!
— Arindam Bagchi (@MEAIndia) August 22, 2021
IAF special repatriation flight with 168 passengers onboard, including 107 Indian nationals, is on its way to Delhi from Kabul. pic.twitter.com/ysACxClVdX
वायुसेनेनं सी-१७ विमान भारतात दाखल झाल्यानंतर एअर इंडियाचं एका विमानानं शनिवारी ८७ भारतीयांना घेऊन काबुल विमानतळावरुन उड्डाण केलं आहे. तेही विमान लवकरच भारतात दाखल होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार कागदपत्रांची पडताळणी आणि काबुल विमानतळ सध्या अमेरिकेच्या ताब्यात असल्यानं संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या २४ तासांत ३९० भारतीयांची काबुलहून सुटका
गेल्या २४ तासांत एकूण ३९० भारतीयांची काबुलहून सुखरूपरित्या सुटका करण्यात आली आहे. आज सकाळी १६८ जणांना घेऊन हवाई दलाचं विमान गाझियाबादमध्ये दाखल झालं आहे. तर ८७ जणांना घेऊन येणारं एअर इंडियाचं विमान आज दिल्ली विमानतळावर दाखल होणार आहे. याआधी १३५ जणांची सुटका करण्यात आली होती. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुखरूपपणे मायदेशी आणण्याकडे भारतीय परराष्ट्र मंत्रालय अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवून असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
#WATCH | 168 passengers, including 107 Indian nationals, arrive at Hindon IAF base in Ghaziabad from Kabul, onboard Indian Air Force's C-17 aircraft
— ANI (@ANI) August 22, 2021
Passengers are yet to come out of the airport as they will first undergo the #COVID19 RT-PCR test.#Afghanistanpic.twitter.com/x7At7oB8YK
अफगाणिस्तानात अजूनही शेकडो भारतीय अडकून
अफगाणिस्तनातून आतापर्यंत ३९० भारतीयांना मायदेशी आणण्यात आलेलं असलं तरी अजूनही जवळपास ४०० जण काबुलमध्ये अडकून असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारत, अमेरिका आणि इतर मित्र देशांच्या साथीनं अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे.