Afghanistan crisis : अफगाणिस्तानातील हिंदू, शिख बांधवांना भारतात आश्रय देणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 11:34 PM2021-08-17T23:34:44+5:302021-08-17T23:34:52+5:30

Afghanistan crisis : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना, येणाऱ्या काही दिवसांत भारतीय नागरिकांना अफगाणिस्तानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासंदर्भात आवश्यक सर्व उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

Afghanistan crisis Prime Minister Modi's big announcement Hindus and Sikhs in Afghanistan will be given asylum in India | Afghanistan crisis : अफगाणिस्तानातील हिंदू, शिख बांधवांना भारतात आश्रय देणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Afghanistan crisis : अफगाणिस्तानातील हिंदू, शिख बांधवांना भारतात आश्रय देणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

googlenewsNext

अफगाणिस्तानातील परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी 7 LKM येथे मंगळवारी मोठी बैठक झाली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात येणाऱ्या प्रत्येक अल्पसंख्यक व्यक्तीला मदद केली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. या बैठकीला गृह मंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि एनएसए अजित डोवालही उपस्थित होते. (Prime Minister Modi's big announcement Hindus and Sikhs in Afghanistan will be given asylum in India)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना, येणाऱ्या काही दिवसांत भारतीय नागरिकांना अफगाणिस्तानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासंदर्भात आवश्यक सर्व उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "भारताने केवळ आपल्या नागरिकांचेच संरक्षण नव्हे, तर ज्या शिख आणि हिंदू अल्पसंख्यकांची भारतात येण्याची इच्छा आहे, त्यांचेही संरक्षण करायला हवे आणि त्यांना आश्रयही द्यायला हवा. एढेच नाही, तर आपण त्यांना शक्य ती सर्व प्रकारची मदतही करायला हवी. तसेच मदतीसाठी भारताकडे डोळे लावून बसलेल्या आपल्या अफगान भाऊ आणि बहिणींना मदद केली जाईल," असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

अफगाणिस्तानात तालिबान विरोधात ब्रिटन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, दिले महत्वाचे संकेत

या बैठकीत पंतप्रधान मोदींचे मुख्य सचिव डॉक्टर पीके मिश्रा, एनएसए अजित डोवाल आणि कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. याशिवाय परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला आणि राजदूत रुद्रेंद्र टंडनदेखील बैठकीत उपस्थित होते, असे बोलले जाते. राजदूत टंडन काबूलहून येणाऱ्या विमानाने आज जामनगरमध्ये दाखल झाले.

अफगाणिस्तानसाठी विशेष क्रमांक जारी -
यातच परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी आज मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाकडून 24 तास चालणारे विशेष अफगाणिस्तान सेलचे क्रमांक जारी केले आहेत.
Phone numbers: +91-11-49016783, +91-11-49016784, +91-11-49016785
WhatsApp number: +91-8010611290
E-mail: SituationRoom@mea.gov.in

ना कुटुंबियांशी संपर्क..., ना मायदेशी जाण्याची सोय...; अफगाणी तरुणाची मदतीसाठी धडपड

 

Web Title: Afghanistan crisis Prime Minister Modi's big announcement Hindus and Sikhs in Afghanistan will be given asylum in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.