Afghanistan crisis : तालिबानचं समर्थन करणाऱ्यांना लाज वाटायला हवी, योगी आदित्यनाथ भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 05:08 PM2021-08-19T17:08:34+5:302021-08-19T17:23:30+5:30

Afghanistan crisis : तालिबानचं समर्थन करणाऱ्यांनी तेथील महिला आणि लहान मुलांचा विचार करायला हवा. गुरुवारी विधानसभा सत्रात बोलताना मुख्यमंत्र्यांनी तालिबावरही भाष्य केलं.

Afghanistan crisis : Shame on those who support the Taliban, Yogi Adityanath erupted | Afghanistan crisis : तालिबानचं समर्थन करणाऱ्यांना लाज वाटायला हवी, योगी आदित्यनाथ भडकले

Afghanistan crisis : तालिबानचं समर्थन करणाऱ्यांना लाज वाटायला हवी, योगी आदित्यनाथ भडकले

Next
ठळक मुद्देकाहीजणांकडून निर्लज्जपणे तालिबानचं समर्थन करण्यात येत आहे. विधानसभेत समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान यांनी केलेल्या विधानावर योगींनी आक्षेप घेतला. अशा चेहऱ्यांना समाजासमोर उघडं पाडलं पाहिजे, असे म्हणत विरोधकांना जोरदार प्रहार केला.

लखनौ - अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानी सत्ता आल्यापासून जगभरातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत तसं भारतातही यावर विविध भाष्य केले जात आहे. सपा खासदार आणि ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं तालिबानचं कौतुक केले आहेत. अशातच प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा(Munawwar Rana) यांनी तालिबान प्रकरणावरुन वादग्रस्त विधान केल्यानं अनेकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता, तालिबानचं समर्थन करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. 

तालिबानचं समर्थन करणाऱ्यांनी तेथील महिला आणि लहान मुलांचा विचार करायला हवा. गुरुवारी विधानसभा सत्रात बोलताना मुख्यमंत्र्यांनी तालिबावरही भाष्य केलं. तसेच, राज्यातील सरकारी कर्मचारी, गरिब, दलित नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. तसेच, कोरोना कालावधीत राज्य सरकारने चांगलं काम केल्याचंही ते म्हणाले. 

काहीजणांकडून निर्लज्जपणे तालिबानचं समर्थन करण्यात येत आहे. विधानसभेत समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान यांनी केलेल्या विधानावर योगींनी आक्षेप घेतला. अशा चेहऱ्यांना समाजासमोर उघडं पाडलं पाहिजे, असे म्हणत विरोधकांना जोरदार प्रहार केला. तुम्ही तर तालिबांनींचं समर्थन करत आहात. अध्यक्षजी, येथे काहीजण तालिबान्यांचं समर्थन करत आहेत. महिलांसोबत क्रुरता करणाऱ्यांचं समर्थन होतंय. दरम्यान, शफीकुर्रहमान यांच्या विधानावरुन सभागृहात गोंधळही निर्माण झाला होता. 

काय म्हणाले होते खासदार

सपाचे लोकसभेतील खासदार शफीकुर्रहमान यांनी तालिबानच्या कृत्याचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, तालिबानची तुलना थेट भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी केली. दरम्यान प्रकारानंतर उत्तर प्रदेशच्या संभलमधील समाजवादी पक्षाचे लोकसभा खासदार शफीकुर रेहमान बर्क (MP Shafiqur Rahman Barq) यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका भाजपच्या कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौलाना नोमानी यांनीही केलं समर्थन

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनीही तालिबानचं समर्थन केलं आहे. 'एका नि:शस्त्र समाजाने बलाढ्य शक्तींचा पराभव केला आहे. ते काबुलच्या राजवाड्यात शिरले, संपूर्ण जगाने हे पाहिलं. त्यांच्यात कोणताही गर्व किंवा अहंकार नव्हता. तालिबानी तरुण काबूलच्या मातीचं चुंबन घेत आहेत. अभिनंदन. दूरवर बसलेला हा हिंदी मुस्लिम तुम्हाला सलाम करतो. तुमच्या धाडसाला सलाम करतो', असं मौलाना सज्जाद नोमानी यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशात हिंदू तालिबानी - राणा

उत्तर प्रदेशात काही प्रमाणात तालिबानी आहेत. याठिकाणी केवळ मुस्लीम नाही तर हिंदू तालिबानीही आहेत. दहशतवादी फक्त मुस्लीम असतो का? तो हिंदूही असू शकतो. महात्मा गांधी साधे होते. नथुराम गोडसे तालिबानी होता. उत्तर प्रदेशात तालिबानीसारखं काम होत आहे असंही मुन्नवर राणा यांनी एका चॅनेलला मुलाखत देताना म्हटलं आहे. मुन्नवर राणा यांनी यापूर्वीही अनेक प्रकरणावर वादग्रस्त विधानं केली आहेत. तालिबानी मुद्द्यावर अलीकडे समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी तालिबानींची तुलना भारतातील स्वातंत्र्य लढ्याशी केली आहे. शफीकुर्रहमान यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर देशद्रोहाची तक्रार दाखल झाली आहे.
 

Web Title: Afghanistan crisis : Shame on those who support the Taliban, Yogi Adityanath erupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.