अफगाणिस्तानात, पाकिस्तानसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के

By admin | Published: December 26, 2015 04:07 AM2015-12-26T04:07:36+5:302015-12-26T09:02:12+5:30

अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपाचे पाकिस्तानसह उत्तर भारतात ठिकठिकाणी भूकंपाचे धक्के शुक्रवारी रात्री जाणवले.

In Afghanistan, earthquake shocks in northern India with Pakistan | अफगाणिस्तानात, पाकिस्तानसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के

अफगाणिस्तानात, पाकिस्तानसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के

Next
>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपाचे  धक्के पाकिस्तानसह उत्तर भारतात ठिकठिकाणी  शुक्रवारी रात्री जाणवले.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान विभागाच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता  ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदु हा अफगाणिस्तानच्या सीमेजवळील भूभागापासून १८६ किलोमीटर खोलवर होता. 
राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात शुक्रवारी रात्री  १२ वाजून ४४ मिनिटांनी या भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी भूकंपामुळे लोक घाबरून घरातून बाहेर रस्त्यावर आले.  
दरम्यान, या भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये ३०० लोक जखमी झाल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. मात्र भारतात कोणतीही जिवीत अथवा वित्तहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही.
 

Web Title: In Afghanistan, earthquake shocks in northern India with Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.