Afghanistan Taliban Crisis: “अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनींना भारतात येण्याचे आमंत्रण द्यावे”: BJP खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 01:12 PM2021-08-19T13:12:29+5:302021-08-19T13:19:07+5:30

भारताने अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष डॉ. घनी यांना येथे राहण्यासाठी आमंत्रित करावे, असे एका भाजपच्या ज्येष्ठ खासदाराने म्हटले आहे.

Afghanistan Taliban Crisis: "Afghan President Ashraf Ghani should be invited to India": BJP MP | Afghanistan Taliban Crisis: “अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनींना भारतात येण्याचे आमंत्रण द्यावे”: BJP खासदार

Afghanistan Taliban Crisis: “अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनींना भारतात येण्याचे आमंत्रण द्यावे”: BJP खासदार

googlenewsNext
ठळक मुद्देभारताने अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष डॉ. घनी यांना भारतात राहण्यासाठी आमंत्रित करावेपाकव्याप्त काश्मीरसाठी ते भारताला मदत करू शकतीलभाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा सल्ला

नवी दिल्ली: अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यानंतर एकेक प्रांतावर ताबा घेत तालिबानने अफगाणिस्तावर पूर्ण ताबा मिळवला. तेथे तालिबानचे सरकार स्थापण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यातच तालिबान काबुलमध्ये शिरल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी पलायन केले. अखेर अशरफ घनी आणि त्यांचे कुटुंबीय अबूधाबीत असल्याची माहिती मिळाली आहे. तालिबानच्या ताब्यानंतर भारताच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष लागले आहे. यातच आता भाजपच्या एका खासदाराने, भारत सरकारने अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांना भारतात येण्याचे आमंत्रण द्यावे, असे म्हटले आहे. (subramanian swamy says india should invite afghanistan president dr ghani to live in india)

“मी पुन्हा मायदेशात परत येईन, चर्चा सुरू आहे”; देश सोडल्यानंतर अशरफ घनींची प्रतिक्रिया

आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी पुन्हा एकदा चर्चेत आलेत. यावेळी, त्यांनी अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल भाष्य करताना अफगाणिस्तानातून परागंदा झालेल्या राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांना भारताने राहण्यासाठी आमंत्रण द्यावे, असा सल्ला दिला आहे. यासंदर्भात सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केले आहे. 

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

ते भारताला मदत करू शकतील

भारताने अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष डॉ. घनी यांना भारतात राहण्यासाठी आमंत्रित करावे. ते उच्च शिक्षित आहेत आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अमेरिकेच्या आधुनिक हत्यारांसह  तालिबानकडून घुसखोरीचा प्रयत्न केला जाईल, त्यावेळेस ते भारताला मदत करू शकतील, असे ट्विट स्वामी यांनी केले आहे. 

संभाव्य परिणामांसाठी तयार राहण्याची गरज

अलीकडेच तालिबान, पाकिस्तान आणि चीन मिळून भारतावर हल्ला करू शकतात, अशी शक्यता सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केली होती. भविष्यात कोण चुकीचे किंवा कोण बरोबर, याचा अंदाज लावणे हे वेळ वाया घालवण्यासारखे ठरेल. यासाठी दोन किंवा अधिक संभाव्य परिणामांसाठी तयार राहण्याची गरज आहे, असे स्वामी यांनी म्हटले होते. 

तालिबानने भारतातून होणारी आयात-निर्यात रोखली; अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर निर्णय

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आपल्या कुटुंबासह अबू धाबीमध्ये आहेत. संयुक्त अरब अमिराती (यूएई) च्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मानवतेच्या आधारावर UAE राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबाला आश्रय देत आहे, असे यूएईने म्हटले आहे. २० वर्षांच्या लढाईनंतर अखेर रविवारी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. देशात हिंसाचाराला सामोरे जावे लागू नये म्हणून अनेकांनी देश सोडला आहे. 
 

Web Title: Afghanistan Taliban Crisis: "Afghan President Ashraf Ghani should be invited to India": BJP MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.