Afghanistan Taliban Crisis: “एअरपोर्टवर पोहचताच तालिबानींनी गोळीबार सुरु केला...”; भारतात परतलेल्या सविता शाहींचा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 08:30 PM2021-08-20T20:30:28+5:302021-08-20T20:31:47+5:30

अफगाणिस्तानाहून परतलेल्या देहरादूनच्या रहिवासी सविता मागील ८ वर्षापासून तिथं काम करत होत्या. परंतु अफगाणिस्तानची ही अवस्था त्यांनी आजतागायत पाहिली नाही.

Afghanistan Taliban Crisis Dehradun woman recounts her escape from Taliban rule after fall of Kabul | Afghanistan Taliban Crisis: “एअरपोर्टवर पोहचताच तालिबानींनी गोळीबार सुरु केला...”; भारतात परतलेल्या सविता शाहींचा थरारक अनुभव

Afghanistan Taliban Crisis: “एअरपोर्टवर पोहचताच तालिबानींनी गोळीबार सुरु केला...”; भारतात परतलेल्या सविता शाहींचा थरारक अनुभव

Next
ठळक मुद्दे मागील ८ वर्षापासून अमेरिका आणि नाटो सेनेसोबत काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.अफगाणिस्तानातील लोक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले.१५ ऑगस्ट रोजी काबुल एअरपोर्टवर तालिबानने पूर्णपणे कब्जा केला होता. त्यामुळे याठिकाणच्या विमान वाहतुकीवर परिणाम झाला.

देहरादून – अफगाणिस्तानतालिबानच्या हाती गेल्यानंतर त्याठिकाणची परिस्थिती अत्यंत भयावह बनली आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील होतं. यावेळी काबुलच्या नाटो आणि अमेरिकन सेनेच्या मेडिकल टीमसोबत मागील ८ वर्षापासून असणाऱ्या सविता शाही दोन दिवसांआधी देहरादूनला सुखरुप पोहचल्या. मायदेशी परतल्यानंतर सविता यांनी अफगाणिस्तानातील थरारक अनुभव त्यांच्या शब्दात सांगितला.

सविता शाही म्हणाल्या की, मागील ८ वर्षापासून अमेरिका आणि नाटो सेनेसोबत काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु भारतीय वायूसेनेने ग्लोबल लीडरची क्षमता पाहून केवळ भारतीय राजदूत आणि कर्मचारी नव्हे तर नाटो आणि अमेरिकेच्या सेनेसोबत अनेक दुसऱ्या लोकांना सुरक्षितपणे स्वत:च्या विमानाने दोहा, कतार, दुबई आणि नॉर्वे येथे पोहचवलं असं त्यांनी सांगितले.

इतक्या लवकर सगळं बदलेल वाटलं नाही

अफगाणिस्तानाहून परतलेल्या देहरादूनच्या रहिवासी सविता मागील ८ वर्षापासून तिथं काम करत होत्या. परंतु अफगाणिस्तानची ही अवस्था त्यांनी आजतागायत पाहिली नाही. सविताने सांगितले की, नाटो आणि अमेरिकन सेनेसोबत काम करताना काहीच जाणवलं नाही की अफगाणिस्तानात इतक्या कमी दिवसांत सगळं बदलेल आणि चहुबाजून हाहाकार माजेल. १३ आणि १४ ऑगस्टला तालिबानने अचानक अफगाणिस्तानच्या काबुलवर कब्जा केला. त्यानंतर अफगाणिस्तानातील लोक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले.

एअरपोर्टवर पोहचताच तालिबानींनी गोळीबार केला...

१५ ऑगस्ट रोजी काबुल एअरपोर्टवर तालिबानने पूर्णपणे कब्जा केला होता. त्यामुळे याठिकाणच्या विमान वाहतुकीवर परिणाम झाला. १६ ऑगस्टच्या संध्याकाळी अमेरिकन सेना मिलिट्री एअरपोट जे नागरी विमान एअरपोर्टच्या अगदी जवळ आहे. त्याठिकाणाहून मेडीकल टीम मेंबरसह दुसऱ्या लोकांना रेस्क्यू करण्याच्या तयारीत लागली होती. संध्याकाळी ६ वाजता मिलिट्री एअरपोर्टवर अमेरिका आणि नाटो सेनेसोबत काम करणारे लोक एअरपोर्टवर पोहचले तेव्हा अचानक तालिबानींनी गोळीबार सुरु केला. अशा स्थितीत सर्व लोकांना सुरक्षितपणे पुन्हा कॅम्पमध्ये आणलं. त्यानंतर रात्री उशीरा किंवा उद्या सकाळपर्यंत वाट पाहण्यास सांगण्यात आले.

अफगाणिस्तानच्या या परिस्थितीबाबत सविता शाही पुढे सांगतात की, बाहेर सर्व अफगाणी लोक देश सोडून जाण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यावेळी आमच्या कॅम्पमधील एका सदस्याने इंडियन एंबेसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा माहिती मिळाली भारतीय वायूसेनेचं एअरक्राफ्ट भारतीय राजदूत, कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना रेस्क्यू करण्यासाठी मिलिट्री एअरपोर्टला येणार आहे. भारतीय वायूसेनेचं विमान आल्यानंतर त्यात जागा मिळाली नाही तेव्हा अनेक जणांनी खाली बसून प्रवास केला. जवळपास ३.३० वाजता विविध विमानांनी काबुलहून परतलेल्या लोकांना दिल्लीला सुखरुप आणलं गेले. त्यानंतर भारतीय राजदूत कार्यालयाने अमेरिकन सेनेचे मेडिकल कॅम्पमधील ७ लोकांना ६.१० वाजता विमानात बसवलं. ते ७.३० वाजता विमान १५० लोकं घेऊन जामनगर गुजरातसाठी उड्डाण घेतले. त्यानंतर सर्व लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. १७ ऑगस्टला सकाळी आम्ही सगळे भारतात परतलो.  

Web Title: Afghanistan Taliban Crisis Dehradun woman recounts her escape from Taliban rule after fall of Kabul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.