भारतातील मुस्लिमांसंदर्भात तालिबानचं मोठं वक्तव्य, अफगाणिस्तानातील अल्पसंख्यकांची करून दिली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 11:11 AM2021-09-04T11:11:03+5:302021-09-04T11:11:03+5:30
अफगानिस्तानात तालिबान सरकार स्थापन करत असतानाच सुहैल शाहीनने हे वक्तव्य केले आहे. अफगाणिस्तानात नव्या सरकारची रूपरेखा तयार झाली आहे. हे सरकार मुल्ला बरादरच्या नेतृत्वाखाली काम करेल.
काबूल - नवे सरकार स्थापन होण्यापूर्वीच, तालिबानने भारतासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने भारतातील (मुस्लीम) अल्पसंख्यकांसंदर्भात भाष्य केले आहे. जर आपण (भारत) माझ्या देशात अल्पसंख्यकांसाठी आवाज उचलण्याचा अधिकार घेता, तर मग तुमच्या देशातील अल्पसंख्याकांसाठी आवाज उठवण्याचा अधिकार आम्हाला का नसावा? असा प्रश्न शाहीनने केला आहे. (Afghanistan Taliban spokesperson suhail shaheen on the question of muslim minorities in india)
सुहेल शाहीन म्हणाला, की मी कोणत्याही लष्करी कारवाईबद्दल बोलत नाही. कारण आमच्याकडे परराष्ट्रांसंदर्भात अजेंडा नाही. आमचा इतर देशांमध्ये लष्करी हस्तक्षेप करण्याचा हेतू नाही आणि आमची भूमी इतरांच्या विरोधात वापरण्याची परवानगीही कुणालाही नाही.
धक्कादायक! तालिबान्यांनी गोळीबारानं केलेल्या सेलिब्रेशनमध्ये लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू
मुल्ला बरादरच्या नेतृत्वात नवं सरकार -
अफगानिस्तानात तालिबान सरकार स्थापन करत असतानाच सुहैल शाहीनने हे वक्तव्य केले आहे. अफगाणिस्तानात नव्या सरकारची रूपरेखा तयार झाली आहे. हे सरकार मुल्ला बरादरच्या नेतृत्वाखाली काम करेल. बऱ्याच दिवसांपासून तालिबानकडून काबूलमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू आहे. काबुलच्या प्रेसिडेंशियल पॅलेसमध्ये सजावट सुरू आहे, नवीन झेंडे तयार केले जात आहेत.
पंजशीरवरही तालिबानचा कब्जा...
तालिबानने शुक्रवारी पंजशीरवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. मात्र, तालिबानच्या पंजशीरबाबतच्या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पंजशीरमध्ये अहमद मसूदच्या नेतृत्वाखाली तालिबानवर कारवाई सुरू आहे. या भागात मोठ्या संख्येने जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे.
स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला पाठिंबा देणारे लोक तालिबानी मानसिकतेचे: जावेद अख्तर