अफगानिस्तानचा मोठा निर्णय; भारतातील दुतावास कार्यालय बंद केल्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 08:16 AM2023-10-01T08:16:40+5:302023-10-01T08:26:16+5:30

अतिशय दु:ख, वेदना आणि निराशेतून आम्ही सांगू इच्छितो की, नवी दिल्लीतील अफगानिस्तानचे दुतावास कार्यालय बंद करण्याची घोषणा करण्यात येत आहे

Afghanistan's Big Decision; Announcement of closure of embassy in India | अफगानिस्तानचा मोठा निर्णय; भारतातील दुतावास कार्यालय बंद केल्याची घोषणा

अफगानिस्तानचा मोठा निर्णय; भारतातील दुतावास कार्यालय बंद केल्याची घोषणा

googlenewsNext

नवी दिल्ली - अफगानिस्तानने आज म्हणजेच १ ऑक्टोबर २०२३ पासून भारतातील दुतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतसरकारकडून सहकार्य मिळत नसल्याचे आणि अफगानिस्तानसाठी मदतींची पूर्तता करण्यात सरकारला अपयश येत असल्याने आपण हे दुतावास केंद्र बंद करत आहोत, अशी घोषणाच अफगानिस्तान सरकारने केली आहे. सरकारकडून हवे असलेलं समर्थन मिळत नसल्याने कामकाजात अडचण निर्माण होत आहे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

अफगानिस्तानने म्हटले की, अतिशय दु:ख, वेदना आणि निराशेतून आम्ही सांगू इच्छितो की, नवी दिल्लीतील अफगानिस्तानचे दुतावास कार्यालय बंद करण्याची घोषणा करण्यात येत आहे. हा निर्णय अत्यंत खेदजनक आहे. मात्र, अफगानिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील आजपर्यंतचे ऐतिहासिक संबंध आणि दिर्घकाळापासूनची भागिदारी लक्षात घेऊनच हा निर्णय विचारपूर्वकच घेण्यात आला आहे.  

भारतात दुतावासाकडील समर्थनाचा अभाव आणि काबुलमध्ये वैध सरकारच्या अनुपस्थितीमुळे अफगानिस्तान व तेथील नागरिकांच्या सर्वोत्तम हित, सेवा, अपेक्षां आणि गरजांची पूर्तता करण्यात आम्ही कमी पडत आहोत हे स्वीकार करतो. दुतावासासाठी व्हिसा नुतनीकरणापासून ते सहकार्याच्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात वेळ आणि अपेक्षित मदतीची पूर्तता न झाल्याने आमच्या टीममध्ये निराशा निर्माण झाली आहे. त्यामुळे, नियमित कर्तव्यांची पूर्तता करण्याची आमची क्षमता कमी झाल्याचेही अफगानिस्तानने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे. 
 

Web Title: Afghanistan's Big Decision; Announcement of closure of embassy in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.