ऐतिहासिक! जन, गण, मन...; नागालँडच्या विधानसभेत ५८ वर्षांनी वाजली राष्ट्रगीताची धून
By देवेश फडके | Published: February 21, 2021 12:55 PM2021-02-21T12:55:32+5:302021-02-21T12:58:46+5:30
नागालँडमधील विधानसभेत ऐतिहासिक घटना घडली आहे. तब्बल ५८ वर्षांनी नागालँडच्या विधानसभेत राष्ट्रगीताची (National Anthem) धून वाजवण्यात आली. एका ट्विटर युझरने याबाबतची माहिती दिली आहे. नागालँड विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणावेळी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली.
कोहिमा :नागालँडमधील विधानसभेत ऐतिहासिक घटना घडली आहे. तब्बल ५८ वर्षांनी नागालँडच्या विधानसभेत राष्ट्रगीताची (National Anthem) धून वाजवण्यात आली. एका ट्विटर युझरने याबाबतची माहिती दिली आहे. नागालँड विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणावेळी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली. (after 58 years for the first time national anthem played in nagaland assembly)
नागालँडच्या विधानसभेत राष्ट्रगीताची धून वाजणे ही ऐतिहासिक घटना असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ०१ डिसेंबर १९६३ रोजी नागालँडला राज्याचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर नागालँडच्या विधानसभेत कधीही राष्ट्रगीत गायिले अथवा वाजवण्यात आले नाही. यासंदर्भात बोलताना नागालँड विधानसभेचे अध्यक्ष शरिंगेन लोंगकुमर यांनी सांगितले की, विधानसभेत राष्ट्रगीताची धून वाजवण्याचा निर्णय त्यांचा होता आणि त्यासाठी मुख्यमंत्री नेफियू रियो यांची सहमती घेण्यात आली होती.
धक्कादायक! देशात तब्बल ७,६८४ प्रकारचे कोरोना; सर्वाधिक प्रकार दक्षिण भारतात
राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली, तेव्हा विधानसभेतील किती सदस्यांनी राष्ट्रगीत म्हटले, याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र, विधानसभेतील सर्व सदस्यांनी राष्ट्रगीताची धून सुरू झाल्यावर उभे राहून राष्ट्रगीताला सन्मान दिला, असे समजते.
विधानसभेत राज्यपालांचे स्वागत नव्या पद्धतीने करण्याचा मानस होता. राज्यपालांचे पद घटनात्मक असल्यामुळे त्यांचे स्वागत नेहमी राष्ट्रगीताने व्हायला हवे. त्यामुळे राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली. या ऐतिहासिक घटनेची पुढे परंपरा होईल आणि ही परंपरा कायम राहील, असा विश्वास विधानसभा अध्यक्षांनी व्यक्त केला.
राष्ट्रगीताची धून वाजवणे अनिवार्य नाही
दरम्यान, घटनातज्ज्ञ सुभाष कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा सभागृहात राष्ट्रगीताची धून वाजवणे अनिवार्य नाही. राष्ट्रगीताचा सन्मान करणे हा मूलभूत जबाबदारी असल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे राष्ट्रगीताचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे कश्यप यांनी सांगितले.