अखेर सपा-काँग्रेसची 'हात'मिळवणी

By admin | Published: January 17, 2017 02:22 PM2017-01-17T14:22:18+5:302017-01-17T14:42:03+5:30

सर्व चर्चांना पूर्णविराम देत आगामी विधासभा निवडणुकांसाठी काँग्रेसने अखेर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाशी 'हात'मिळवणी केली आहे.

After all, the Congress-NCP alliance is in the fray | अखेर सपा-काँग्रेसची 'हात'मिळवणी

अखेर सपा-काँग्रेसची 'हात'मिळवणी

Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. १७ -  सर्व चर्चांना पूर्णविराम देत आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने अखेर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाशी 'हात'मिळवणी केली आहे. इतकेच नव्हे तर गांधी परिवाराचे परंपरागत बालेकिल्ले असलेल्या उत्तर प्रदेशातील ही निवडणूक अखिलेश यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसतर्फे देण्यात आले आहेत. 
दुपारी काँग्रेसतर्फे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. अर्थात २२८ जागांपैकी उभयपक्ष किती जागा लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा तपशील येत्या दोन दिवसांत जाहीर केला जाईल. मधल्या काळात 'एकला चलो रे' अशी भूमिका घेऊ पाहणा-या काँग्रेसने उत्तर प्रदेशात मात्र प्रादेशिक पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, याअगोदर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित या काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील, असे जाहीर करण्यात आले होते. अखिलेश यांच्या 'सपा'सोबत जाण्याचा निर्णय होताच आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे दीक्षित यांनी लागलीच स्पष्ट केले. 
90 टक्के आमदारांचा पाठिंबा आणि निवडणूक आयोगानेही अखिलेश यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरा समाजवादी पक्ष संबोधत पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह ‘सायकल’ वापरण्याचा अधिकार दिल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये सपाच मोठा भाऊ ठरेल, यात शंका नाही. 
आम्ही काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करणार आहोत, असे  अखिलेश गटाची बाजू सर्वत्र ठामपणे मांडणारे त्यांचे काका रामगोपाल यादव यांनी कालच जाहीर केले होते.  

 

Web Title: After all, the Congress-NCP alliance is in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.