अम्फान, निसर्गनंतर देशावर अजून एका चक्रीवादळाचे सावट, हवामान खात्याने जारी केला अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 05:33 PM2020-06-22T17:33:25+5:302020-06-22T17:40:00+5:30
अम्फान आणि निसर्ग या चक्रीवादळांना अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील भागात विध्वंस घडवल्यानंतर आता देशाच्या किनारपट्टीवर अजून एक वादळ धडकण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
भुवनेश्वर - एकीकडे कोरोना विषाणूच्या संकटाशी संपूर्ण देश झुंजत असताना दुसरीकडे देशावर एकापाठोपाठ एक नैसर्गिक आपत्ती येत आहे, अम्फान आणि निसर्ग या चक्रीवादळांना अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील भागात विध्वंस घडवल्यानंतर आता देशाच्या किनारपट्टीवर अजून एक वादळ धडकण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
हवामान खात्याने याबाबात माहिती देताना सांगितले की, ओदिशाला लागून असलेल्या समुद्री भागात सायक्लोनिक अॅक्टिव्हिटी दिसून आल्या आहेत. तसेच हवामाना खात्याचे अधिकारी किनारपट्टी भागातीली परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, या परिस्थितीबात हलामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज जारी करण्यात आलेल्या अलर्टमध्ये हवामान खात्याने सांगितले की, ओदिशाचा अंतर्गत भाग आणि आसपासच्या परिसरातील समुद्री क्षेत्रात ०.९ किमी-७.६ किमीच्या दरम्यान, दक्षिणेकडे कल असलेले चक्रीवादळ तयार होत आहे, हे चक्रीवादळ पुढच्या तीन दिवसांत उत्तर पश्चिमेच्या दिशेकडे सरकू शकते.
A cyclonic circulation is seen over north interior Odisha & neighbourhood between 0.9 km & 7.6 km above mean sea level tilting southwards with height. It is very likely to move northwestwards during next 3 days: India Meteorological Department (IMD) pic.twitter.com/O5aHcgYtu3
— ANI (@ANI) June 22, 2020
गेल्या महिन्यातच आलेल्याा अम्फान चक्रीवादळामुळे ओदिशामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वादळ आणि पावसामुळे ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. तसेच अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
त्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवाद आले होते. या चक्रीवादळात कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मोठी हानी झाली होती.