'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी झाल्याने प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 08:45 AM2017-09-12T08:45:15+5:302017-09-12T08:57:10+5:30

छत्तीसगडमधील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकाऱ्याची सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी झाल्याने अडचणीत आल्या होत्या.

After attending 'Kaun Banega Crorepati', the trainee deputy collector said, | 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी झाल्याने प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अडचणीत

'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी झाल्याने प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अडचणीत

Next
ठळक मुद्दे छत्तीसगडमधील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकाऱ्याची सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी झाल्याने अडचणीत आल्या होत्या. उपजिल्हाधिकारी केबीसीमध्ये सहभागी झाल्याच विषय इतका वाढला की या प्रकरणात छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. मंगोली जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अनुराधा अग्रवाल यांची निवड ‘कौन बनेगा करोडपती’साठी झाली होती.

रायपूर, दि. 12- छत्तीसगडमधील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकाऱ्याची सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी झाल्याने अडचणीत आल्या होत्या. उपजिल्हाधिकारी केबीसीमध्ये सहभागी झाल्याचा विषय इतका वाढला की या प्रकरणात छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. मंगोली जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अनुराधा अग्रवाल यांची निवड ‘कौन बनेगा करोडपती’साठी झाली होती. भोपाळमध्ये ऑडिशन झाल्यानंतर अनुराधा अग्रवाल यांना कार्यक्रमाच्या शुटिंगसाठी मुंबईला बोलावण्यात आलं. बीबीसीने हे वृत्त दिलं आहे. 

अनुराधा दिव्यांग आहेत. त्यांना वॉकरच्या सहाय्याने चालावं लागतं. कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी होऊन तिथे मिळालेल्या पैशातून भावाच्या किडनीवर उपचारासाठी पैसे जमा करणं अनुराधा यांचा उद्देश होता. या कार्यक्रमाच्या शुटिंगच्या एक दिवस अगोदरच अनुराधा यांच्या आईचं निधन झालं. पण तरीही कुटुंबीयांच्या सल्ल्यामुळे केबीसीच्या शुटिंगसाठी अनुराधा मुंबईमध्ये आल्या. 

अनुराधा यांनी कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभाद घेतला या कार्यक्रमात त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासमोरच्या हॉट सीटवर बसून प्रश्नांची उत्तरंही दिली. प्रश्नांची अचून उत्तरं दिल्याने अनुराधा यांनी प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरावर ठरलेले पैसेही मिळाले. पण केबीसीचं शुटिंग संपवून मंगोलीमध्ये परतल्यानंतर केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना परवानगीच देण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समजली.  केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी अनुराधा यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परवानगी मिळवली होती. पण परवानगीचं पत्र वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांनी सुट्टी टाकून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. पण अनुराधा यांचा ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय अमान्य करण्यात आल्याचं पत्र सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांनी अनुराधा यांना पाठवलं.

अनुराधा यांचं प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. प्रशासकीय अधिकाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी होण्याची परवानगी अधिकृतपणे परिपत्रक जारी करुन दिली जातं. पण राज्यातील एखाद्याची बुद्धी राष्ट्रीय स्तरावर दाखवण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना रोखलं जातं, अशी टीका काँग्रेसने भाजप सरकारवर केली. या प्रकरणावरून सरकारवर टीका व्हायला सुरू झाल्यानंतर सरकारने अनुराधा यांना परवानगी दिली. मुख्यमंत्री रमन सिंह यांनी याबाबतची औपचारिकता पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. सरकारने परवानगी दिल्यामुळे आता भावावर उपचार करणार असल्याचं अनुराधा यांनी सांगितलं. कौन बनेगा करोडपतीच्या या भागाचं प्रक्षेपण 20 सप्टेंबर रोजी होणार आहे.

सोमवारी संपूर्ण दिवस अनुराधा अग्रवालचा मुद्दा छत्तीसगडमध्ये गाजला. राज्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री रमन सिंह यांनी अधिकाऱ्यांना याप्रकरणी आदेश जारी केले आणि त्यानंतर या कार्यक्रमाच्या परवानगी संबंधी सगळी औपचारीकता पूर्ण झाली. कार्यक्रमाच्या काही नियमांमुळे त्या किती रक्का जिंकल्या हे सांगितलं नाही.  

Web Title: After attending 'Kaun Banega Crorepati', the trainee deputy collector said,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.