अॅक्सिसनंतर आता कोटक महिंद्रावर आयकर विभागाचा छापा
By admin | Published: December 23, 2016 11:36 AM2016-12-23T11:36:17+5:302016-12-23T11:36:17+5:30
कोटक महिंद्राच्या कस्तुरबा गांधी शाखेत बनावट खाती तयार करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - अॅक्सिसनंतर आता कोटक महिंद्रा बँक आयकर विभागाच्या रडारवर आहे. कोटक महिंद्रा बँकेत आयकर विभागाने छापा टाकला आहे. कोटक महिंद्राच्या कस्तुरबा गांधी शाखेत बनावट खाती तयार करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला. खात्यांमध्ये एकूण 70 कोटी रुपये सापडले असून हे सर्व पैसे काळ्याचे पांढरे केल्याचा संशय आहे. रमेश चांद आणि राज कुमार यांच्या नावे ही अकाऊंट आहेत.
कोटक महिंद्राने मात्र आपल्या बँकेत कोणतीही बनावट खाती नसून या खातेधारकांनी केवायसी प्रक्रिया पुर्ण केल्याचा दावा केला आहे. 'आयकर विभागाचे अधिकारी कस्तुरबा गांधीमधील शाखेत आले होते, आणि दोन खातेधारकांसंबंधी ब्रांच मॅनेजरकडे चौकशी केल्याचं', बँकेचे प्रवक्ता रोहित राव यांनी सांगितलं आहे.
IT Dept raided Kotak Bank KG Marg branch in connection with survey on 2 of its customers & related a/cs, bank denies that were any fake a/cs pic.twitter.com/fC04mtg9Lh
— ANI (@ANI_news) 23 December 2016