अयोध्या, काशीनंतर आता मथुरेचा विकास - याेगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 08:24 AM2021-12-31T08:24:13+5:302021-12-31T08:24:35+5:30
Yogi Adityanath : फारुखाबाद आणि अमरोहा येथे भाजपच्या ‘जन विश्वास यात्रा’त जाहीरसभेत बोलताना आदित्यनाथ म्हणाले,“समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसने अयोध्येत राम मंदिर बांधले नाही, आमच्या सरकारने लोकांच्या श्रद्धेचा सन्मान करून त्यांच्या विकासासाठीही काम केले आहे.”
फारुखाबाद : अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या आश्वासनाची भाजपने पूर्तता केली आहे, असे सांगून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी काशीनंतर आता मथुरेच्यासुद्धा विकासाचे काम सुरू झाले आहे, असे येथे म्हटले.
फारुखाबाद आणि अमरोहा येथे भाजपच्या ‘जन विश्वास यात्रा’त जाहीरसभेत बोलताना आदित्यनाथ म्हणाले,“समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसने अयोध्येत राम मंदिर बांधले नाही, आमच्या सरकारने लोकांच्या श्रद्धेचा सन्मान करून त्यांच्या विकासासाठीही काम केले आहे.”
आम्ही म्हटले होते की, अयोध्येत रामाच्या भव्य मंदिराचे बांधकाम सुरू करू. मोदीजींनी ते काम सुरू केले, असेही आदित्यनाथ म्हणाले. “आता काशीत (वाराणसी) भगवान विश्वनाथ धाम भव्य प्रमाणावर उभारले जात असताना मथुरा-वृंदावन मागे कसे राहील? ब्रज तीर्थ विकास परिषद स्थापन करून आम्ही त्या भागात विकास कामांना गती दिली आहे.”