पाकची आगळीक रोखण्यासाठी सीमेवर लष्कर बनवणार एअर डिफेन्स युनिट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 04:35 PM2019-05-14T16:35:41+5:302019-05-14T16:37:30+5:30

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि लष्कराच्या अंतर्गत आढाव्यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर एअर डिफेन्स युनिट तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

after balakot air strike indian army to move air defence unit closer to pakistan border | पाकची आगळीक रोखण्यासाठी सीमेवर लष्कर बनवणार एअर डिफेन्स युनिट

पाकची आगळीक रोखण्यासाठी सीमेवर लष्कर बनवणार एअर डिफेन्स युनिट

Next

नवी दिल्लीः गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि लष्कराच्या अंतर्गत आढाव्यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर एअर डिफेन्स युनिट तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाकिस्तानकडून होत असलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. लष्कराचं हे एअर डिफेन्स युनिट पाककडून होणाऱ्या आगळिकीला उत्तर देण्यास सक्षम आहे. पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेला घेरा बंदी करण्याच्या दृष्टीनं लष्कराची तुकडी आणि एअर डिफेन्स युनिट तैनात करण्यात येणार आहे.

या एअर डिफेन्स युनिटमुळे पाकिस्तानकडून होत असलेल्या हवाई हल्ल्यांना लागलीच चोख प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. एअर डिफेन्स सिस्टीम जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात, राजस्थानला लागून असलेल्या पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात येणार आहे. शत्रू राष्ट्रांकडून होत असलेले हवाई हल्ले रोखण्याची यात ताकद आहे. हे एअर डिफेन्स युनिट आकाश मिसाइल्स आणि रशियन क्वादार्ट सिस्टीमनं बनवण्यात आलं आहे. तसेच लवकरच यात लष्कराला इस्रायल आणि डीआरडीओनं बनवलेल्या MR-SAM डिफेन्स सिस्टीमही मिळणार आहे.
  
14 फेब्रुवारीला पुलवमामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. यानंतर भारत पलटवार करणार या भीतीने पाकिस्तानने सीमेवर विशेष सैन्य तैनात केले होते.जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये जम्मू-श्रीनगर राज्यमार्गावरून जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता. पाकिस्तानने आक्रमक दल 1 आणि दोन या पथकांना माघारी बोलावले नव्हते. यामुळे शकरगडमध्येही तैनात केलेले रणगाडे चिंतेचा विषय बनले आहेत. 
 

Web Title: after balakot air strike indian army to move air defence unit closer to pakistan border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.