Yellow fungus infection : काळ्या, पांढऱ्या बुरशीनंतर आता पिवळी बुरशी; भारतात रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली, जाणून घ्या लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 12:35 PM2021-05-24T12:35:30+5:302021-05-24T13:09:27+5:30
yellow fungus infection cases reported in India . काळ्या व पांढ्या बुरशीच्या रोगाशी सामना करताना आता पिवळ्या बुरशीचा रुग्ण देशात सापडला आहे आणि तो अधिक धोकादायक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडलेला जागोजागी दिसत आहे. ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांना बेड्स मिळवण्यासाठी नातेवाईकांना करावी लागणारी धडपड, ही सर्व संकटं समोर असताना नवे संकट उभे राहिले आहे. काळ्या व पांढ्या बुरशीच्या रोगाशी सामना करताना आता पिवळ्या बुरशीचा रुग्ण देशात सापडला आहे आणि तो अधिक धोकादायक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ( After black and white fungus, yellow fungus infection cases reported in India)
देशात मागील २४ तासांत २ लाख २२,३१५ नव्या रुग्णांची भर पडली, तर ३ लाख २,५४४ रुग्ण ब रे झाले. ४४५४ रुग्णांना मागील २४ तासांत प्राण गमवावे लागले आहेत. देशात आतापर्यंत एकूण २ कोटी ६७ लाख ५२,४४७ कोरोना रुग्ण आढळले असून त्यापैकी २ कोटी, ३७ लाख २८,०११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ३ लाख ३७२० रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. आतापर्यंत १९ कोटी ६० लाख ५१,९६२ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
India reports 2,22,315 new #COVID19 cases, 3,02,544 discharges & 4,454 deaths in last 24 hrs, as per Health Ministry
— ANI (@ANI) May 24, 2021
Total cases: 2,67,52,447
Total discharges: 2,37,28,011
Death toll: 3,03,720
Active cases: 27,20,716
Total vaccination: 19,60,51,962 pic.twitter.com/hLqCFosYuw
काळ्या बुरशीच्या रुग्णांची संख्या वाढत असताना रविवारी उत्तर प्रदेश येथील गाझियाबाद येथे पिवळ्या बुरशीचा रुग्ण आढळला आणि ही बुरशी अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे. ( Symptoms, causes of yellow fungus, which is more dangerous than black fungus and white fungus). पिवळ्या बुरशीच्या रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत.
काय आहेत लक्षणं ? ( Symptoms of Yellow Fungus)
- भूक कमी लागणे किंवा लागणेच नाही, वजन कमी होणे, सुस्तपणा
- पू ची गळती आणि जखमेवर हळूहळू उपचार होणे, कुपोषण, अवयव निकामी होणे, डोळे येणे
- अशी लक्षणं दिसल्यास तातडीनं उपचार घेणे गरजेचे आहे.
पिवळी बुरशी होण्यामागचं कारण ( Causes of Yellow fungus)
- अस्वच्छता हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. शिळं अन्न खाऊ नये.
- घरातील दमटपणाही महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे अधिक दमट वातावणामुळे बुरशी होण्याचे संकटही वाझते.
उपचार ( Treatment of Yellow Fungus)
- Amphotericin B injection ( अॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शन) हे यावरील औषध आहे.