माघार नाही...; रक्त गोठवणारी थंडी अन् सीमेवरील तणावातही जवानांनी गलवान नदीवर तयार केला पूल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 05:52 PM2020-06-20T17:52:12+5:302020-06-20T17:59:14+5:30
चीनबरोबर जबरदस्त तणाव असतानाच, भारतीय लष्कराच्या वीर जवानांनी 60 मीटर लांब असलेला हा पूल गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण केला. एवढेच नाही, तर लष्कराने 2 तास त्यावर वाहने चालवून त्याचे परीक्षणही केले.
नवी दिल्ली : लडाखमधील प्रत्यक्ष सीमा रेषेवर (LAC) चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीनंतरही भारतीय लष्कर ठामपणे सीमेवर उभे आहे. या झटापटीनंतर सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झालेला असतानाही लष्कराच्या एका युनिटने गलवान खोऱ्यात एका पुलाचे काम सुरूच ठेवले. सांगण्यात येते, की लष्कराच्या याच कामावरून गलवान खोऱ्यात दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, 15 जूनला झालेल्या हिंसक झटापटीनंतर काही तासांतच भारतीय लष्कराच्या लढवय्या जवानांनी गलवान नदीवर पुलाचे काम पूर्ण केले आहे. लष्करातील अभियंत्यांना हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट
60 मीटर लांब आहे पूल -
चीनबरोबर जबरदस्त तणाव असतानाच, भारतीय लष्कराच्या वीर जवानांनी 60 मीटर लांब असलेला हा पूल गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण केला. एवढेच नाही, तर लष्कराने 2 तास त्यावर वाहने चालवून त्याचे परीक्षणही केले. या पुलामुळे आता भारतीय जवानांना LACपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.
भारतीय जवान आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर, लगेचच मंगळवारी सकाळी लष्कराच्या कारू बेस्ड डिव्हिजनने, कुठल्याही प्रकारचा विलंब न करता पुलाचे काम वेगात करा, असा संदेश अभियंता डिव्हिजनला पाठवला होता. 'बेली ब्रिज' अर्थात हा एक प्रकारचा पोर्टेबल पूल आहे. यामुळे लष्कराच्या सर्व प्रकारच्या वाहनांना सहज पणे ये-जा करणे सोपे येईल.
India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार
सोमवारी रात्री झालेल्या घटनेसारख्याच घटा पुन्हा होऊ शकतात, अशी शंका असल्याने स्थानीक कमांडर्सनी हा पूल लवकरात लवकर तयार करण्याचे निर्देश दिले होते. जेने करून भारतीय सैन्याला मदत होईल. या पुलापासून घटनास्थळ केवळ काही किलो मीटर अंतरावर आहे.
भारत चीन वाद सुरू असतानाच पुलाचे काम करत असलेल्या अभियंत्यांना संरक्षण देण्यासाठी इंफन्ट्री युनिटला निर्देश देण्यात आले होते. अशा प्रकारे लष्कराच्या अभियंत्यांनी रक्तही गोठेल, एवढ्या थंडीतसुद्धा मंगळवारी आणि बुधवारी रात्रीही आपले काम सुरूच ठेवले आणि पुलाचे काम पूर्ण केले.