बदलीनंतरही कर्मचारी ठाण मांडून जि.प.तील चित्र : वरिष्ठांची मर्जी

By Admin | Published: October 27, 2015 09:07 PM2015-10-27T21:07:15+5:302015-10-27T21:07:15+5:30

जळगाव- जिल्हा परिषदेत मे महिन्यात प्रशासकीय बदली होऊनही विविध विभागांमधील वरिष्ठांची मर्जी असलेले कर्मचारी ठाण मांडून आहेत. त्यांची बदली पंचायत राज कमिटीचा दौरा आटोपल्यावर करू, असे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले होते. परंतु ही कमिटी जि.प.त आलीच नाही.

After the change, the picture of ZP by an employee was asked: Superiors' favor | बदलीनंतरही कर्मचारी ठाण मांडून जि.प.तील चित्र : वरिष्ठांची मर्जी

बदलीनंतरही कर्मचारी ठाण मांडून जि.प.तील चित्र : वरिष्ठांची मर्जी

googlenewsNext
गाव- जिल्हा परिषदेत मे महिन्यात प्रशासकीय बदली होऊनही विविध विभागांमधील वरिष्ठांची मर्जी असलेले कर्मचारी ठाण मांडून आहेत. त्यांची बदली पंचायत राज कमिटीचा दौरा आटोपल्यावर करू, असे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले होते. परंतु ही कमिटी जि.प.त आलीच नाही.
अजूनही प्रशासकीय बदली झालेल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी पाठविले जात नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्यालयात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ असलेल्या कर्मचार्‍यांची बदली करण्याचा नियम आहे. यात काही कर्मचारी तर १० वर्षांपासून मुख्यालयात आहेत. त्यांच्या बदलीबाबत कुठलीही फाईल फिरत नसल्याने त्यांचे प्रशासनातील वरिष्ठांशी साटेलोटे असल्याचे चर्चिले जात आहे.

या कर्मचार्‍यांची बदली झाली, पण ते होते तेथेच ठाण मांडून
सामान्य प्रशासन विभागात ए.बी.कुरकुटे, संजय इंगळे, बाल कल्याण विभागात विजय ठाकरे, बांधकाम विभागात योगेश मराठे, मिलिंद सुपे या कर्मचार्‍यांची बदली मे महिन्यात झाली आहे. पण ते याच विभागांमध्ये अजूनही कार्यरत आहेत. या कर्मचार्‍यांची पंचायत राज कमिटीच्या दौर्‍यानंतर बदली केली जाईल, असे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले होते. परंतु या कर्मचार्‍यांची बदली केलेली नाही.
या संदर्भात माहिती घेण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदू वाणी यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ होता.

Web Title: After the change, the picture of ZP by an employee was asked: Superiors' favor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.