३२ पायऱ्या चढल्यानंतर श्रीरामललाचे होणार दर्शन;जटायू मूर्ती, यज्ञ मंडप भाविकांचे लक्ष वेधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 08:32 AM2024-01-21T08:32:48+5:302024-01-21T08:50:19+5:30

श्रीरामांची जन्मभूमी अयाेध्या येथे भव्य श्रीराम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे.

After climbing the 32 steps of the temple, one will have the darshan of Shri Ramalala. | ३२ पायऱ्या चढल्यानंतर श्रीरामललाचे होणार दर्शन;जटायू मूर्ती, यज्ञ मंडप भाविकांचे लक्ष वेधणार

३२ पायऱ्या चढल्यानंतर श्रीरामललाचे होणार दर्शन;जटायू मूर्ती, यज्ञ मंडप भाविकांचे लक्ष वेधणार

अयाेध्या- श्रीरामांची जन्मभूमी अयाेध्या येथे भव्य श्रीराम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी केवळ मुख्य मंदिर, इतर अनेक बांधकाम हाेत आहेत. मुख्य मंदिराशिवाय आजूबाजूचा परिसर, तीर्थक्षेत्राचा विकास इत्यादी अनेक गाेष्टी अयाेध्येत हाेत आहेत. ७० एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात संग्रहालय, सभागृह, जटायू मूर्ती, यज्ञ मंडप, औषधी वनस्पतींचे उद्यान इत्यादी अनेक गाेष्टी भाविकांचे लक्ष वेधून घेतील. मंदिराच्या ३२ पायऱ्या चढल्यानंतर श्रीरामललाचे दर्शन हाेणार आहे. 

श्रीराम मंदिराच्या परिसरात कायकाय आहे?

  • ७० एकर एकूण परिसर.
  • राम मंदिरात एकूण ५ शिखर आणि १४ द्वार. 
  • २.७ एकर जागेत मुख्य मंदिर बांधण्यात येत आहे.
  • ५.७४ लाख चाैरस फूट एवढे मंदिराचे एकूण बांधकामक्षेत्र आहे.
  • तीन मजले असतील. प्रत्येक तळाची उंची २० फूट राहणार आहे.
  • तळमजल्यावर १६० स्तंभ, पहिल्या माळ्यावर १३२ 
  • आणि दुसऱ्या माळ्यावर ७४ स्तंभ राहणार आहेत.
  • श्रीरामलल्लांचे पुराणकालिक दर्शनमंडळ प्रकल्पात जन्मभूमी संग्रहालय राहणार आहे. 
  • उत्खननात आढळलेले शिलालेख, पुरातन अवशेष इत्यादी वस्तू ठेवण्यात येतील.
  • गुरू वशिष्ठ पीठिकेत वेद, पुराण, रामायण आणि संस्कृत अध्ययन आणि संशाेधन क्षेत्र राहणार आहे.
  • श्रीराम मंदिरासाठी झालेल्या आंदाेलनात प्राण गमाविलेल्यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारकही उभारण्यात येणार आहे.
  • २५ हजार लाेकांसाठी मंदिर परिसरात लाॅकरची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
  • मंदिर परिसराच्या दाेन बाजूंनी अग्निशमन केंद्र राहणार आहेत.
  • भाविकांना आराेग्य सेवेची गरज भासल्यास जवळच एक रुग्णालयदेखील उभारण्यात येणार आहे.

यांचीही मंदिरे बांधणार
मंदिराभाेवती आयताकृती तटबंदी आहे. तटबंदीच्या चारही काेपऱ्यात श्रीगणेश, महादेव, देवी भगवती, सूर्य यांच्यासह महर्षी वाल्मीकी, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निशादराज, माता शबरी आणि देवी अहिल्या यांची मंदिरे बांधण्यात येणार आहेत.

या दिशेने हाेणार प्रवेश, या दिशेने पडाल बाहेर
मंदिरात पूर्व दिशेकडून भाविक प्रवेश करतील. दर्शन केल्यानंतर दक्षिण दिशेकडून भाविक बाहेर पडतील. मंदिर परिसरात एकूण ४४ दरवाजे आहेत.

तळमजल्याचे काम पूर्ण
जमिनीच्या उत्तरेकडील भागात तीन मजली मंदिर बांधण्यात येत आहे. तळमजल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून पहिल्या मजल्याचे काम सुरू आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली.

शरयू नदीत जाणार नाही मंदिरातील सांडपाणी
मंदिर परिसरात दाेन स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया केंद्र राहणार आहेत. मंदिरातून बाहेर निघणारे पाणी शरयू नदीत जाणार नाही. मंदिरातच त्यावर प्रक्रिया करण्यात येईल. याशिवाय मंदिरासाठी पिण्याचे पाणी आणि वीजजाेडणीदेखील वेगळी राहणार आहे.

२२ लाख घनफूट दगडाचा वापर

मंदिराच्या निर्मितीसाठी २१ ते २२ लाख घनफूट दगडांचा वापर केला आहे. त्यात सुमारे ५ लाख घनफूट एवढा गुलाबी दगड वापरला आहे. गाभारा मकराना संगमरमरी दगडाचा बनविला आहे. कर्नाटक आणि तेलंगणा येथून १७ हजार ग्रेनाइटचे ब्लाॅक्सदेखील वापरण्यात येत आहेत.

Web Title: After climbing the 32 steps of the temple, one will have the darshan of Shri Ramalala.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.