चार मीटरच्या खड्ड्याला कट मारून प्रज्ञान राेव्हर निघाला पुढे...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 07:20 AM2023-08-29T07:20:10+5:302023-08-29T07:20:25+5:30
प्रग्यान रोव्हर चंद्रावर चालत असताना वाटेत एक खड्डा आला. या खड्ड्याला टाळून त्याने नवा मार्ग शोधून काढला. खड्डा व रोव्हरने शोधलेली नवी वाट यांची छायाचित्रे इस्रोने ‘एक्स’वर पाेस्ट केली.
बंगळुरू : चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमंती करणाऱ्या प्रग्यान रोव्हरच्या वाटेत चार मीटर खोल खड्डा आला. मात्र रोव्हरने खड्ड्याला टाळून नवी वाट शोधत आपला प्रवास पुढे सुरू ठेवला. ही माहिती इस्रोने एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवर सोमवारी लिहिलेल्या पोस्टमध्ये दिली आहे.
प्रग्यान रोव्हर चंद्रावर चालत असताना वाटेत एक खड्डा आला. या खड्ड्याला टाळून त्याने नवा मार्ग शोधून काढला. खड्डा व रोव्हरने शोधलेली नवी वाट यांची छायाचित्रे इस्रोने ‘एक्स’वर पाेस्ट केली.
प्रज्ञान घेणार पाण्याचा शाेध : प्रग्यान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पृष्ठभागावरील माती, दगड यांची तपासणी करत आहे. चंद्रावरील खनिजे, गोठलेले पाणी यांचाही वेध प्रग्यान रोव्हर घेणार आहे.