मृत्यूनंतर मिळाला शास्त्रज्ञाला न्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 03:05 AM2018-09-20T03:05:13+5:302018-09-20T03:05:33+5:30
के. चंद्रशेखर १९९२ पासून अवकाश संशोधन संस्थेत भारताचे प्रतिनिधी होते
बंगळुरू : इस्रो हेरगिरी प्रकरणात विनाकारण अटक झाल्याने विलक्षण मनस्ताप भोगावा लागलेले शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना ५० लाख रुपयांची भरपाई द्यावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
असाच न्याय आपल्यालाही मिळेल, अशी या प्रकरणात अटक झालेल्यांपैकी एक शास्त्रज्ञ के. चंद्रशेखर यांनाही अपेक्षा होती. खटल्याचा निकाल त्यांना हवा होता तसाच लागला; पण निकालाच्या आधीच त्यांचे निधन झाले होते. विजयम्मा म्हणाल्या, चंद्रशेखर यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यांनी पहाटे कॉफी प्यायला मागितली. त्या दिवशी हेरगिरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालय देणार असलेल्या निकालाची वाट पाहत आहे, असेही त्यांनी सांगितले. के. चंद्रशेखर १९९२ पासून अवकाश संशोधन संस्थेत भारताचे प्रतिनिधी होते. अटकेनंतर त्यांच्या कुटुंबाची परवड झाली असती. पण पत्नी विजयम्मा नोकरी करीत होत्या. त्यामुळे तशी स्थिती ओढवली नाही.