पराभवानंतर अजय माकन यांचा निकाल, पदाचा राजीनामा
By Admin | Published: April 26, 2017 11:57 AM2017-04-26T11:57:02+5:302017-04-26T12:02:47+5:30
दिल्ली महापालिकेतील निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - दिल्ली महापालिकेतील निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपाने आम आदमी पक्षाचा सुपडा साफ केला असून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेसने 34 जागा जिंकल्या आहेत. अजय माकन यांनी निकालानंर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.
आम्ही थोड्या प्रमाणात का होईना पुनरागमन केलं आहे, मात्र अपेक्षा होती तेवढं यश मिळू शकलं नाही अशी कबुली अजय माकन यांनी दिली. काँग्रेसच्या खराब प्रदर्शनाची जबाबदारी घेत आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच पुढील एक वर्ष मी कोणतंही पद घेणार नाही, सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करेन असंही ते बोलले आहेत.
Take responsibility for defeat and I am going to resign as Delhi Congress President: Ajay Maken #MCDelections2017pic.twitter.com/mNzEiCq5CU
— ANI (@ANI_news) April 26, 2017
काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांकडे माझा राजीनामा सोपवणार आहे. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत मला एक उदाहरण समोर ठेवायचं आहे असं अजय माकन यांनी सांगितलं.