दिल्ली मनपा निवडणुकीतील पराभवानंतर "आप"मध्ये राजीनामा सत्र

By admin | Published: April 27, 2017 11:46 AM2017-04-27T11:46:21+5:302017-04-27T12:51:10+5:30

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीचा झालेल्या दणदणीत पराभवानंतर पार्टीमध्ये आता पदाधिका-यांकडून राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले आहे.

After the defeat of the Delhi Municipal Elections, the resignation session in "AAP" | दिल्ली मनपा निवडणुकीतील पराभवानंतर "आप"मध्ये राजीनामा सत्र

दिल्ली मनपा निवडणुकीतील पराभवानंतर "आप"मध्ये राजीनामा सत्र

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या झालेल्या दणदणीत पराभवानंतर पार्टीमध्ये आता पदाधिका-यांकडून राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले आहे. 
 
बुधवारी संध्याकाळी पार्टीचे दिल्लीतील पार्टीचे अध्यक्ष दिलीप पांडे यांनी राजीनामा दिला होता तर गुरुवारी सकाळी अन्य नेत्यांनी आपले राजीनामे सुपुर्द करण्यास सुरुवात केली आहे. 
 
विशेष म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अगदी जवळचे मानले जाणारे संजय सिंह यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली होती.  
(आता केजरीवालांसमोर उरले "हे" चार पर्याय)
 
सिंह यांच्याव्यतिरिक्त दिल्लीचे प्रभारी आशिष तलवार यांनीही दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकीत "आप"च्या झालेल्या पराजयाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानी पार्टीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. 
पंजाबमधील पार्टीचे सह-प्रभारी दुर्गेश पाठक यांनीही आपल्या पदाची राजीनामा दिला आहे. "मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. देशात आणखी चांगल्या सुधारणा आणण्यासाठी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नियमित काम करत राहणार", अशी माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे.
 
तर दुसरीकडे, दिल्ली मनपा निवडणुकीचे निकाल हाती येताच आमदार अल्का लांबा यांनी आपला राजीनामा सादर केला होता. त्यांच्या मतदारसंघातील तिन्ही प्रभागांमध्ये पार्टीचा पराजय झाल्यानं त्यांनी आपला आपला राजीनामा सादर केला होता. 
 
पंजाबमधील "आप"चे प्रभारी संजय सिंह, दिल्लीतील पार्टीचे अध्यक्ष दिलीप पांडे असोत किंवा दुर्गेश पाठक ही सर्व नेतेमंडळी अरविंद केजरीवाल यांच्या अगदी जवळील असल्याचे मानले जाते. या नेत्यांना पंजाब विधानसभा निवडणूक आणि दिल्लीतील मनपा निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली होती.  मात्र या निवडणुकांमध्ये आपचा सुपडा साफ झाला.
 
यादरम्यान, संजय सिंह आणि दुर्गेश पाठक यांच्यावर पंजाबमध्ये तिकीट वाटपाचा आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र अरविंद केजरीवाल यांना या सर्व नेत्यांवर विश्वास होता. 
 
मात्र, दिल्ली मनपा निवडणुकीतील "आप"चा दणदणीत पराभव पाहता पार्टीतील वाद तसंच असंतोष टाळण्यासाठी आता आपमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.  
 

Web Title: After the defeat of the Delhi Municipal Elections, the resignation session in "AAP"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.