विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अरविंद केजरीवाल पोहोचले विपश्यना केंद्रात; १० दिवस ध्यान करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 09:31 IST2025-03-05T09:28:18+5:302025-03-05T09:31:21+5:30

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाबमधील होशियारपूर येथील विपश्यना केंद्रात जाणार आहेत.

After defeat in assembly elections, Arvind Kejriwal reaches Vipassana center will meditate for 10 days | विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अरविंद केजरीवाल पोहोचले विपश्यना केंद्रात; १० दिवस ध्यान करणार

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अरविंद केजरीवाल पोहोचले विपश्यना केंद्रात; १० दिवस ध्यान करणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा मोठा पराभव झाला.  माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. दरम्यान, आता अरविंद केजरीवाल पुढचे दहा दिवस पंजाब येथील होशियारपूरमधील विपश्यना केंद्रात दहा दिवसांसाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. केजरीवाल तिथे दहा दिवस ध्यान करणार आहेत. केजरीवार त्यांच्या परिवारासह मंगळवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत होशियारपूरमध्ये पोहोचले आहेत. 

अमेरिका अन् युक्रेनमध्ये मोठा खनिज करार होणार; डीलवर आज स्वाक्षरी होणार

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज म्हणजेच बुधवारी ध्यान केंद्रात पोहोचले आहेत. रात्री ते त्यांच्या कुटुंबासह चौहल येथील नेचर हटमध्ये राहिले. ते होशियारपूरहून थेट चौहलला पोहोचले. सुमारे ३० ते ३५ वाहनांचा ताफा थेट चौहल येथे पोहोचला आहे.

त्यांच्या ताफ्यात जिल्हा प्रशासनाची काही वाहनेही होती. यावेळी ते त्यांच्या कुटुंबासह ध्यान करण्यासाठी पोहोचले आहेत. अरविंद केजरीवाल १५ मार्चपर्यंत साधना करतील. 

मिळालेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांचे कुटुंब दहा दिवस म्हणजेच १५ मार्चपर्यंत ध्यानासाठी येथे राहतील.

याआधीही अरविंद केजरीवाल या केंद्रात आले होते, पण त्यावेळी ते चौहलला गेले नव्हते आणि त्या काळात ते दहा दिवस या केंद्रात राहिले होते. तेव्हा ते दिल्लीचे मुख्यमंत्री होते.

वेळापत्रकानुसार, केजरीवाल यांचे दैनंदिन काम आज सकाळी ६ वाजता सुरू झाले आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील होशियारपूरला भेट देऊ शकतात.

गेल्या वेळी जेव्हा अरविंद केजरीवाल होशियारपूर ध्यान केंद्रात आले होते, तेव्हा भगवंत मान देखील होशियारपूरमध्येच राहिले होते. यावेळी अरविंद केजरीवाल होशियारपूरच्या चौहल गावात बांधलेल्या नेचर हटमध्ये भगवंत मान जिथे राहिले होते तिथे पोहोचले आहेत. त्याआधी, त्यांच्या वास्तव्यादरम्यान, ते आनंदगड गावात असलेल्या विपश्यना ध्यान केंद्रात ध्यान करत होते.

Web Title: After defeat in assembly elections, Arvind Kejriwal reaches Vipassana center will meditate for 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.