पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचे जाळले पोस्टर
By admin | Published: June 18, 2017 11:19 PM2017-06-18T23:19:30+5:302017-06-18T23:25:15+5:30
अंतिम सामन्यात पाकिस्तानने विराट विजय मिळवल्यानंतर नाराज भारतीय चाहत्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंचे पास्टर जाळत आपला राग व्यक्त केला आहे
ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 19 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने विराट विजय मिळवल्यानंतर नाराज भारतीय चाहत्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंचे पास्टर जाळत आपला राग व्यक्त केला आहे. भारताच्या पराभवानंतर माजी कर्णधार एम.एस. धोनीच्या झारखंड येथील घराबाहेर चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही भारतीय खेळाडूवर टीका केली जात आहे. अंतिम सामन्यात सरफराजच्या संघाने कोहलीच्या टीम इंडियाचा 180 धावांनी दणदणीत पराभव केला. त्यानंतर कानपूरमध्ये चाहत्यांनी भारतीय संघातील खेळाडूंचे पोस्टर्स जाळले आहेत. भारतीय चाहते ऐवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी टिव्ही सेटही फोडले आहेत. कानपूर आणि हरिद्वारमध्ये चाहत्यांनी रस्त्यावर उतरत टिव्ही सेट फोडून आपला रोष व्यक्त केला आहे. अंतिम सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 399 धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पुरती ढेपाळली. रथी-महारथी फलंदाज एका मागोमाग एक हजेरी लावत परत तंबूत गेले. भारताकडून एकट्या हार्दीक पांड्याने झुंज देण्याचा प्रयत्न केला.
People protest in Kanpur as India lose to Pakistan in the Champions Trophy Final #CT17#INDvPAKpic.twitter.com/jyIAJZV5TK
— ANI UP (@ANINewsUP) June 18, 2017
#INDvPAK: Locals break TV sets after Pakistan win Champions Trophy final against India. Visuals from Kanpur(UP) & Haridwar (Uttarakhand) pic.twitter.com/DCet1MbnEX
— ANI (@ANI_news) June 18, 2017