जिल्हाधिकार्यांच्या नाराजीनंतर टंचाईग्रस्त गावांची माहिती घेण्यास सुरुवात
By admin | Published: November 3, 2015 11:46 PM2015-11-03T23:46:02+5:302015-11-03T23:46:02+5:30
जळगाव- टंचाईग्रस्त गावांची माहिती न पाठविल्याने जिल्हाधिकार्यांनी जि.प.च्या पाणीपुरवठा विभागावर नाराजी व्यक्त केल्यानंतर या गावांची माहिती गोळा करण्यास जि.प.ने सुरुवात केली.
Next
ज गाव- टंचाईग्रस्त गावांची माहिती न पाठविल्याने जिल्हाधिकार्यांनी जि.प.च्या पाणीपुरवठा विभागावर नाराजी व्यक्त केल्यानंतर या गावांची माहिती गोळा करण्यास जि.प.ने सुरुवात केली. त्यासाठी सर्व तालुक्यांमधील गटविकास अधिकार्यांशी संपर्क साधण्यात आला. टंचाईग्रस्त गावे किती याची माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली. ग्रा.पं.ची जबाबदारी जि.प.कडे का?टंचाईग्रस्त गावांची माहिती का गोळा केली नाही याची विचारणा पाणीपुरवठा विभागात केली असता जि.प.कडे जि.प.तर्फे चालविण्यात येणार्या पाणी योजनांमधील गावांमध्ये काय स्थिती आहे याची माहिती असते. जि.प.तर्फे १३ योजना चालविण्यात येतात. त्यात सुमारे २०० गावांचा समावेश आहे. इतर गावांची माहिती ही गटविकास अधिकार्यांकडे असते, असे स्पष्टीकरण देण्यात आले. टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव मागविण्याचे काम सुरू झाले आहे. त्यास आणखी एक दिवस कालावधी लागेल, अशी माहिती सहायक कार्यकारी अभिंयंता एस.बी.तडवी यांनी दिली.