अखेर भूकंप आलाच, पंतप्रधान मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

By admin | Published: February 7, 2017 12:37 PM2017-02-07T12:37:06+5:302017-02-07T15:00:00+5:30

सोमवारी रात्री आलेल्या भूकंपावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

After the earthquake, Prime Minister Modi blamed Rahul Gandhi | अखेर भूकंप आलाच, पंतप्रधान मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

अखेर भूकंप आलाच, पंतप्रधान मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 7 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करत भाषणाच्या सुरुवातीला उत्तर भारतात झालेल्या भूकंपाचा उल्लेख करत राहुल गांधींचे नाव न घेता त्यांच्यावर उपरोधिक टीका केली. 
उत्तराखंडमध्ये सोमवारी रात्री झालेल्या भूकंपाने उत्तर भारताला जोरदार हादरे बसले.
 
भूकंपामुळे प्रभावित झालेल्या परिसरातील लोकांना सर्व प्रकारची मदत पोहोचवली जात असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली. मात्र यावेळी त्यांनी भूकंपावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला. अखेर भूकंप आलाच, धमकी तर फार पूर्वी दिली होती, असे सांगत मोदींनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे.
 
जेव्हा एखादी व्यक्ती घोटाळ्यातही सेवा आणि नम्रता पाहते तेव्हा धरणीमाताही नाराजी होते आणि भूकंप होतो, अशी बोचरी टीका मोदींनी राहुल गांधींवर केली आहे. 
 
मोदींनी यावेळी काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खर्गेंवरही टीकास्त्र सोडले. 'आमची कुत्र्यांची परंपरा नाही', अशी बोचरी टीका करत मोदींनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना प्रत्युत्तर दिले.  गांधी परिवारातील लोकांनी देशासाठी बलिदान दिले, आरएसएसमधील कुत्रंही यावेळी नव्हतं, असे विधान खर्गे यांनी संसदेत केले होते. त्यावर मोदींनी जशाच तसे प्रत्युत्तर दिले.
 
स्वातंत्र्यलढ्यात सावकर होते ज्यांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. भगत सिंग आणि चंद्रशेखर आझाददेखील होते. पण काँग्रेसला असेच वाटते की स्वातंत्र्य केवळ एकाच कुटुंबाने मिळवून दिले, समस्येचे मूळ हेच आहे, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला.  
 
 

Web Title: After the earthquake, Prime Minister Modi blamed Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.