स्नॅपडीलच्या कर्मचा-यानंतर आता नोएडातून महिला फॅशन डिझायनर गायब

By admin | Published: March 2, 2016 12:45 PM2016-03-02T12:45:44+5:302016-03-02T14:44:00+5:30

काही आठवड्यांपूर्वी दिल्लीतून स्नॅडपडीलची कर्मचारी बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर आता नोएडा येथेही अशीच एक घटना घडली आहे. मात्र यावेळी एका महिला फॅशन डिझायनर गूढरित्या गायब झाली आहे.

After the employee of Snapdev, the women's fashion designer disappeared from Noida | स्नॅपडीलच्या कर्मचा-यानंतर आता नोएडातून महिला फॅशन डिझायनर गायब

स्नॅपडीलच्या कर्मचा-यानंतर आता नोएडातून महिला फॅशन डिझायनर गायब

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - काही आठवड्यांपूर्वी दिल्लीतून स्नॅडपडीलची कर्मचारी बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर आता नोएडा येथेही अशीच एक घटना घडली आहे. मात्र यावेळी एका महिला फॅशन डिझायनर गूढरित्या गायब झाली आहे. शिप्रा मलिक असे त्या महिलेचे नाव असून ती सोमवारपासून बेपत्ता आहे. 
नोएडाची रहिवासी असलेली शिप्रा हिचे स्वत:चे एक बुटिक आहे. चांदनी चौक येथे जाण्यासाठी शिप्रा सोमवारी दुपारी घराबाहेर पडली मात्र त्यानंतर ती अद्याप घरी परतलेली नाही. याप्रकरणी तिच्या पतीने नोएडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांना शिप्राच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर तिची गाडी सापडली. तसेच तिच्या मोबाईलवरून १०० या नंबरवर मदतीसाठी कॉल करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. पोलिस याप्रकरणी कसून तपास करत असून अद्याप खंडणीसाठी कोणताही फोन आलेला नाही.  
सुमारे २-३ आठवड्यांपूर्वी प्रसिद्ध ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'स्नॅपडील'मध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करणारी दीप्ती सराना ही अचानक बेपत्ता झाली. संध्याकाळी ऑफीसमधून घरी जाताना दिप्ती अचानक गायब झाली होती आणि दोन दिवसानंतर ती हरियाणामध्ये सापडली होती. 

Web Title: After the employee of Snapdev, the women's fashion designer disappeared from Noida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.