दारूबंदीनंतर राज्याची ओळख होतेय ‘उडता बिहार’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 06:14 AM2022-01-01T06:14:53+5:302022-01-01T06:15:04+5:30
Bihar : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या आकडेवारीनुसार, २०१५ मध्ये बिहार राज्यात एनसीबीने १२.३ किलो गांजा, १०९ किलो अफू आणि २ किलो चरस जप्त केले होते.
- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारमध्ये दारूबंदी कायदा लागू केल्यानंतर भलेही दारू पिणाऱ्यांची संख्या कमी झाली असेल. पण, राज्यात गत पाच-सहा वर्षात गांजा, अफू आणि चरस यासारख्या मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे हे राज्य आता उडता बिहार बनत आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या आकडेवारीनुसार, २०१५ मध्ये बिहार राज्यात एनसीबीने १२.३ किलो गांजा, १०९ किलो अफू आणि २ किलो चरस जप्त केले होते. २०१६ मध्ये ४९६ किलो गांजा, ८ किलो अफू आणि ३१.५ किलो चरस जप्त केले होते. याच काळात मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दारूबंदी लागू केली होती. मात्र, दोन वर्षांनंतर जप्तीचा हा आकडा भयानक झाला.