चार दिवसानंतर पाणी पुरवठय़ाचा प्रस्ताव(पानावर वाचले) टंचाई आढावा: आलम?ीच्या पाण्याने संकट टाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2015 01:37 AM2015-09-05T01:37:16+5:302015-09-05T01:37:16+5:30
सोलापूर : उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यास विलंब झाल्यास 8 सप्टेंबरपासून चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे.
स लापूर : उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यास विलंब झाल्यास 8 सप्टेंबरपासून चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे. औज बंधार्यातील पाणी पातळी घटल्याने व उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय होण्यास विलंब लागल्याने आयुक्त विजयकुमार काळम?पाटील यांनी पाणी पुरवठा विभागाची शुक्रवारी बैठक घेतली. बैठकीत सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी औज बंधार्याची सद्यस्थिती मांडली. 2. 25 मीटर पाणी पातळी असून, 15 दिवस पाणी पुरणार आहे. आलम?ीच्या पाण्याने सोलापूरकरांचे जलसंकट काही प्रमाणात दूर केले आहे. आलम?ीतून इंडी कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. जादा झालेले पाणी औज बंधार्यात आले आहे. 1. 8 मीटरवर आलेली पातळी दोन दिवसात 2.30 मीटरवर गेली आहे. याशिवाय पाणी सोडल्याने कर्नाटक शेतकर्याकडून उपसा घटला आहे. 14 सप्टेंबरला उजनीतून पाणी सोडले तरी पाणी पोहोचण्यास आठ दिवस लागणार असल्याने तीन दिवस पाणी कपात करावी लागणार आहे. त्या आधी पाणी सोडण्यात आले तर मात्र ही अडचण येणार नाही. चौथा पंप बंद करून ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पावसाची स्थिती अशीच राहिली तर मात्र भविष्यात जलसंकट उभे ठाकणार आहे. त्यामुळे संभाव्य टंचाई लक्षात घेता आत्तापासूनच नियोजन करणे गरजेचे असल्याचे आयुक्त काळम?पाटील म्हणाले. एमआयडीसीच्या पाण्यात कपात करावी लागेल. बांधकामासाठी पाण्याचा वापर टाळावा. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन केले आहे. इन्फो..जिल्हाधिकार्यांच्या टिप्समुंबईत जलसंपदा मंत्र्याकडे झालेल्या बैठकीतील चर्चेवरून जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम?पाटील यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून पाण्याच्या काटकसरीबाबत टिप्स दिल्या. संभाव्य जलसंकट ओळखून उपाययोजना करण्याची त्यांनी सूचना केली. त्याप्रमाणे महापालिकेने नियोजन सुरू केले आहे.इन्फो7 रोजी पुण्यात होणार बैठकसोलापूरच्या पाणी पुरवठय़ासंदर्भात जलसंपदा मंत्री शिवतारे यांनी 7 सप्टेंबर रोजी पुण्यातील विर्शामगृहात बैठक आयोजित केली आहे. बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, आयुक्त, महापौर, उपमहापौर, एनटीपीसीचे व्यवस्थापकीय संचालक, लाभक्षेत्र विकास प्राधीकरणचे अधीक्षक अभियंता यांना बैठकीला बोलाविण्यात आले आहे.